BOOK REVIEW - 'बकुळा'



          काही पुस्तकं नकळतपणे मनाला चटका लावून जातात, विचार करायला भाग पाडतात. प्रेम, त्याग, अस्तित्व, स्वातंत्र्याची जाणीव करुन जातात... अशीच काहीशी ‘बकुळा’ ही लघुकादंबरी.

    जात, धर्म, स्वाभिमान आणि दोन कुटुंबातील वैमनस्यात वाढलेले ती आणि तो. दोघंही हुशार, बुध्दीवान, स्वप्नाळू. तो आणि ती प्रेमात पडतात. दोन्ही कुटुंबांच्या घरामध्ये उभे असलेलं बकुळा हे झाड, जसं दोन्ही घराच्या भांडणांचं साक्षीदार हे झाड आहे तसंच तो आणि तिच्या प्रेमाचा साक्षीदारही.

   घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघंही लग्न करतात. काटकसरीने आपला संसार उभा करतात. यशाच्या उंच शिखरावर त्याने पोहचावं म्हणून ती  स्वप्नांचा त्याग करते. आपण मिळवलेल्या यशात तो स्वार्थी, Business minded बनतो.  हे यश त्याला ‘तीलाही विसरायला लावतं. त्यागाच्या परिभाषेला जाणीव आणि प्रेमाची झालर नसेल तर स्वभाव आत्मकेंद्री बनतो. स्वातंत्र्य आणि स्वत:साठी आनंद मिळवण्याची इच्छा जागी होते. पण यात नात्याचा रबर मात्र ताणला जातो. अशाच नात्याभोवती फिरणारी ही कथा.

     सुधा मुर्ती यांनी कथेची सुस्पष्टपणे मांडणी केलेली आहे. कथेत सुसंगतपणा असल्याने वाचकाला आकर्षित करतात. कथेतील नायक आणि नायकाच्या स्वभावातील कांगोरेही कथेत ट्विस्ट आणतात. वाचकाला कथेत घोळवून ठेवतात. हे अगदी लेखिकेला अचूक जमले आहे याची पानोपानी जाणीव होते.
                                                       
                                                         - Pradnya K. Agale.

Comments

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

TRUST ME !

"२६/११ कसाब आणि मी" - BOOK REVIEW