Posts

Showing posts from August, 2017

BOOK REVIEW - 'बकुळा'

Image
             काही पुस्तकं नकळतपणे मनाला चटका लावून जातात , विचार करायला भाग पाडतात . प्रेम , त्याग , अस्तित्व , स्वातंत्र्याची जाणीव करुन जातात ... अशीच काहीशी  ‘ बकुळा ’  ही लघुकादंबरी .      जात , धर्म , स्वाभिमान आणि दोन कुटुंबातील वैमनस्यात वाढलेले ‘ ती आणि तो ’ . दोघंही हुशार , बुध्दीवान , स्वप्नाळू . तो आणि ती प्रेमात पडतात . दोन्ही कुटुंबांच्या घरामध्ये उभे असलेलं बकुळा हे झाड , जसं दोन्ही घराच्या भांडणांचं साक्षीदार हे झाड आहे तसंच तो आणि तिच्या प्रेमाचा साक्षीदारही .    घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघंही लग्न करतात . काटकसरीने आपला संसार उभा करतात . यशाच्या उंच शिखरावर त्याने पोहचावं म्हणून ती   स्वप्नांचा त्याग करते . आपण मिळवलेल्या यशात तो स्वार्थी , Business minded बनतो .    हे यश त्याला  ‘ तीला ’ ही विसरायला लावतं . त्यागाच्या परिभाषेला जाणीव आणि प्रेमाची झालर नसेल तर स्वभाव आत्मकेंद्री बनतो . स्वातंत्र्य आणि स्वत : साठी आनंद मिळवण्याची इच्छा जागी होते . पण यात नात्य

लग्नाच्या नात्याकडून.... मैत्रिकडे

Image
आज फ्रेन्डशीप डे...     काय लिहावं याचा विचार करत होते. कॉलेज ग्रूपवर लिहावं की मास्टर ग्रूप की रुम पार्टनर की बेस्ट फ्रेन्डबद्दल...(एका   बेस्ट फ्रेन्डबद्दल लिहावं तर दुसरी म्हणायची मी नाही का ?) लिहायलाही घेतलं. काही नवीन लिहितोय वाटत नव्हतं. रटाळ आणि चघळलेले विषयावर लिहायलाही मूड येत नव्हता.     अचानक शेजारी राहणारे काका आणि काकीं नजरे समोर आले. त्यांना दोन मुली. दोघींचीही लग्न झालीयेत. त्यामुळे काका-काकी दोघं घरी एकटेच. पण काका-काकींना कधी वेळ घालवण्यासाठी कोणाची गरजही पडत नाही. '' हम काफी है एक दुजे के लिये ''...  त्यात रिटायर्ड कपल.        रिटायर्ड होणाऱ्या माणसांपुढे अनेक प्रश्न भेडसावत असतात. रिटायर्ड झाल्यावर काय करायचं की दुसरी नोकरी शोधायची की गावी जायचं ?? पण या आमच्या काका-काकींना बहुधा असे प्रश्न पडलेच नसावेत. माझ्या मते हे दोघं एकमेकांचे आयुष्याचे सोबती असण्याआधी चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या मैत्रिबद्दल लिहिण्यासाठी हा सगळा अट्टाहास... काका -काकींच्या मैत्रिच्या प्रवासाला सुरु करण्याआधी त्यांच्या बद्दल थोडंसं........    इं

डँबिस रिलेशन

Image
        ''देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत रहावे'' या म्हणीनुसार जगणारा आणि 'बहिणीला लुटणे' हा माझा जन्मसिध्द अधिकार मानणारा, माझा एकूलता एक भाऊ - प्रशांत             प्रशांतवर लिहायचं कारण असं की ''रक्षाबंधन'' हा दिवस बहीण - भाऊ नात्यासाठी खास असतो. बहीण भावाला राखी बांधते. भावाला समाधानी आयुष्य, मर्यादित संपत्ती लाभो म्हणून बहीण प्रार्थना करते आणि भाऊ बहीणीला गिफ्ट देतो. पण आमच्याकडे असं नाही बरं का. दोघांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचे. म्हणजे कसं भाडणं नको.       इथे एक किस्सा शेअर करावासा वाटतो. रक्षाबंधनाच्या दिवशी आमची भाडणं झाली की .... तो - तुला नाही एेकायचं ना माझं, चल मग माझं गिफ्ट परत दे. मी - मग माझी राखी मला परत दे.      मग आमच्या मातोश्रींनी यावर रामबाण उपाय शोधून काढला. रक्षाबंधन असो वा भाऊबीज दोघांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचं म्हणजे भाडणं नको.      बहीण - भावाच्या नात्यात जर भांडणं नसतील ते कसलं नातं. राजकीय लोकांसारखं दबाव टाकणं. आरोप - प्रत्यारोप करणं हे या डँबिस नात्यात आलंच. मला घरी यायला उशीर झाला तर मला क