Posts

Showing posts from April, 2020
Image
                   हम्पी मैं आपका स्वागत हैं!                                    (भाग 2-3)         ट्रीपचा दुसरा दिवस लवकरच सुरू करायचा म्हणून लवकरच झोपलो. कधी ऑफिसला लवकर न उठणाऱ्या आम्ही तिघी सकाळी 5 वाजताच उठलो. आज सकाळी विठ्ठल मंदिरात जायचं होतं. हम्पीमधलं पर्यटकांचं सर्वाधिक आकर्षक असलेलं पर्यटन स्थळ...विठ्ठल मंदिर. सहाजिकच आमचंही. विठ्ठल मंदिर हे फोटोजेनीक ठिकाण असल्याने आणि सकाळच्या वेळेस पर्यटकही कमी असतील म्हणून सकाळच्या वेळेस जाण्याचं ठरवलं.      तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेल्या विठ्ठल मंदिरात ५६ खांब आहे. या खांबातून संगीत ऐकू येत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.        मंदिराचे बांधकाम राजा कृष्णदेवराय यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाल्याची माहिती मिळते. या मंदिरात एक रथ, तुळशी वृदांवन, म्युझिकल पिलर तर मंदिराच्या मंडपात विष्णुचे अवतार कोरलेले पहायला मिळतात. हम्पीतील प्रत्येक देवळांच्या खांबावर हम्पीचा इतिहास कोरलेला पहायला मिळतो. विठ्ठल मंदिरातील रथाचा फोटो आपल्याला ५० रुपयाच्या नोटवर पहायला मिळतो.          हम्पीत एक तरी hopefull morning