ते खोटं जरा खटकलंच...

                         
...तशी माझी 2 शिफ्ट सुरू होती. न्यूज चॅनलमध्ये कामाला असल्याने घरी निघण्याची वेळ रात्री 10 किंवा 10.30 ... ऑफिस तसं मेट्रो स्टेशनपासून अवघ्या 15  मिनिटांच्या अंतरावर असल्याने चालत जाण्याची सवय. असंच एकदा रात्री 10 च्या सुमारास अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीजवळून हेडफोनस लावून गाणी ऐकत होते. त्यामुळे गाण्यासोबत स्वत:ला इमॅजिन करत आणि हेडफोन्स लावल्यामुळे आणि स्वत:मध्येच गुंतुन गेले होते. तेवढ्यात एक जोडपं आपल्या चिमुरडीसह अचानक समोर आलं. काहीशा घाबरल्या आणि अस्वस्थ सारखे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. तसं मी कधीही कोणत्याही भिकारी किंवा रस्त्यात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीशी न बोलताच सावधगिरीने पुढे जाते. पण या वेळेस असं काहीच घडलं नाही. माझी पाऊलं काहीशी तिथेच थांबली... कदाचित त्यांच्यासोबत असलेल्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे...अन् दीदी एक मदत करा या प्रश्नाने... 
   हेडफोन्स काढून मी त्यांना विचारलं काय झालं? काही हवंय का?.... आमची गाडी चुकली. पैसेही संपलेतभूक लागली आहे. असं तो तरूण म्हणाला( मार्गदर्शन किंवा सल्ले देण्याची मी मदत करण्यासाठी तत्पर तयार होते पण पैशाांची मदत म्हणटलं की नकोच असा स्वभाव)
      आपण इथं नको थांबायला उगंच कशाला नसताना डोक्याला शॉट म्हणून तशीच पुढे गेले. पण त्याची ती विनवणी..त्या चिमुरडीचा चेहरा...काही होईना डोळ्यासमोरुन जात नव्हता. तरीही पुढे जात राहीले तेवढ्यात पप्पांचा फोन आला. त्यांना सगळा प्रसंग सांगितलात्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांना पैसे दे सांगितले. (पण कोणाला पैसे देऊन अपंग न करणं माझं तत्वंथोडं पुढे  गेल्यावर एका टपरीवर भूर्जी-पाव मिळतोय का बघितलंपण त्याच्याकडे फक्त चायनिज होतं. ते ही 150 रुपये एक प्लेटतेवढ्यात पून्हा ते जोडपं मागून आलं. आम्हाला चालेल राईस म्हणून  तो तरुण म्हणाला. सॉरी, मला न परवाडणारं आहे म्हणून मी तेथून निघाले. पण अजूनही मन मागच्या वाटेकडेच होते. ते अजूनही माझ्या मागे येत असतील कात्यांच्याकडे खरंच पैसे नसतील काखरंच त्यांची गाडी चुकली असेल का?खरंच चुकली असावी बहुधा… पण त्या बाईकडे बघून तरी असं काही वाटत नव्हतं कारण तिने सोन्याचं कानातलं घातलं होतं आणि गळ्यातही मंगळसुत्रामध्ये सोन्याचे मणी. कदाचित खोटे ही असावे. मन एकदम अस्वस्थ झालं होतं. न राहून एका छोट्या स्टॉलवर त्यांना बिस्किटं घेऊन दिलं. त्यांची थोडी विचारपूस करावी म्हणून कुठे जायचंयआता कसं जाणारकुठे राहणारविचारलं पण त्यांनी बिस्कट घेतात प्रश्नांना दुर्लक्ष करुन तेथून निघाले. जाऊदे, म्हणून मी पण निघाले...
  पण सुरुवातीपासून मनात कुठेतरी पक्कं माहित होतं की ते दोघंही खोटं बोलतायत. पण दुसरीकडे मदत केल्याचं समाधानही होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी कळालं की त्यांची टोळी असते. ते थातूर –मातूर सांगून लोकांना गंडवतात.
    एखादी व्यक्ती खोटं बोलत असतानाही आपण मदत करतो किंवा आपण त्यांचं खंरं मानून आयुष्यात पुढे जातो. मात्र त्रास होतो अशा खोटं बोलण्याचा. आज 5 ते 6 महिने या घटनेला उलटून गेले असतील पण आजही ते खोटं बोलणं खटकतंच...

                                                                                                                                                                 Pradnya K. Agale

Comments

  1. खूप छान ब्लॉग लिहिला आहेस प्रज्ञा 👌👍

    ReplyDelete
  2. it's all depends on our thoughts nd point of view.....सुंदर मन असलं की, दुनिया तेवढीचं चांगली वाटे् जेवढे आपण आहोत......btt be careful...Really nyc blog👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

"२६/११ कसाब आणि मी" - BOOK REVIEW