हम्पी मैं आपका स्वागत हैं!                                   (भाग 2-3)



        ट्रीपचा दुसरा दिवस लवकरच सुरू करायचा म्हणून लवकरच झोपलो. कधी ऑफिसला लवकर न उठणाऱ्या आम्ही तिघी सकाळी 5 वाजताच उठलो. आज सकाळी विठ्ठल मंदिरात जायचं होतं. हम्पीमधलं पर्यटकांचं सर्वाधिक आकर्षक असलेलं पर्यटन स्थळ...विठ्ठल मंदिर. सहाजिकच आमचंही. विठ्ठल मंदिर हे फोटोजेनीक ठिकाण असल्याने आणि सकाळच्या वेळेस पर्यटकही कमी असतील म्हणून सकाळच्या वेळेस जाण्याचं ठरवलं.



     तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेल्या विठ्ठल मंदिरात ५६ खांब आहे. या खांबातून संगीत ऐकू येत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.




       मंदिराचे बांधकाम राजा कृष्णदेवराय यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाल्याची माहिती मिळते. या मंदिरात एक रथ, तुळशी वृदांवन, म्युझिकल पिलर तर मंदिराच्या मंडपात विष्णुचे अवतार कोरलेले पहायला मिळतात. हम्पीतील प्रत्येक देवळांच्या खांबावर हम्पीचा इतिहास कोरलेला पहायला मिळतो. विठ्ठल मंदिरातील रथाचा फोटो आपल्याला ५० रुपयाच्या नोटवर पहायला मिळतो.

  

     हम्पीत एक तरी hopefull morning आणि एक निवांत संध्याकाळ घालवायची होती. त्यामुळे आम्ही ट्रीपचं प्लानिंग तसंच केलं होतं. काही ठिकाण दुपारी पाहिली तरी चालतील अशी ठिकाणं दुपारी पाहिली. काही ठिकाणं सकाळच्या वेळेस पाहणं योग्य ठरेल. तर काही ठिकाणं संध्याकाळच्या वेळेस. त्यामुळे तो समतोल साधून दिवसाचं नियोजन केलं होतं. हम्पी संग्रहालय, एलिफेंटा स्टेबल, लोटस महाल, झेनेना क्लोझर असे काही छोटे-मोठे  साईड सिन पहाण्यासाठी निघालो. या संग्रहालयात तुम्हाला जुन्या काळातील भांडी, मूर्ती, दागिने पाहयला मिळतील. १५०० च्या काळात एलिफेंटा स्टेबल बांधलं गेलं. येथे हत्तींना ठेवले जाई.

Lotus Mahal, Hampi.


















     आज पुन्हा आम्हाला सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा होता म्हणून पुन्हा विरूपक्ष मंदिर गाठलं. विरुपक्ष मंदिराजवळील डोंगरावर जिथून सूर्यास्त स्पष्टपणे नजरेस पडेल अशा ठिकाणी जाऊन बसलो. झोपेल तेवढंच शांत असणाऱ्या आम्ही तिघी तिथे पोहचताच अचानक शांत झालो. समोर दिसणाऱ्या सूर्यास्तामध्ये, शांत वातावरणात रमून गेलो.
Elephanta Stable, Hampi.
तिथे मला एक गोष्ट खूप जाणीवपूर्वक जाणवली ती म्हणजे....

   स्वत:ला पुन्हा नव्यानं जाणून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, स्वतशीच संवाद साधायचा असेल, mind refresh करायचा असेल, निसर्गाशी नव्यानं नातं जोडायचं असेल तर हम्पीमध्ये एक तरी संध्याकाळ फक्त स्वत:च्या सहवासात घालवा. नक्कीच
स्वत:ची नव्यानं ओळख होईल.

    जसे आपण शहराच्या गर्दीतही एकटे असतो ना तसा एकटेपणा या अनोळखी गावात जाणवत नाही. हीच हम्पीची खासियत आहे. एक समाधान, Positivity ही संध्याकाळ देऊन जाते. जगण्यासाठी नवीन दृष्टीकोन मिळतो.


Missing Hampi Badly


      इथे राहणाऱ्या लोकांच्या वागणुकीतून बरंच काही शिकायला मिळतं. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो तर बऱ्याच समस्या सहचज सुटतील. नव्या पद्धतीनं काम करण्याची energy मिळते. कोणतंही काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं की त्याचा आनंद social sitesवर दाखवता येत नाही पण Personal life आणि Proffessional lifeमधील problemesकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदलतो. समस्या सोडवण्याचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे  मानसिक समाधान मिळतं.

        हे मानसिक समाधान खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण हेच मानसिक समाधान आपला स्वत:वरचा विश्वास वाढवतं आणि जिंकण्याची जिद्द वाढवतं.
   आयुष्यात आपल्याला हेच तर हवं असतं. पण कधी-कधी नेमकं काय हवं असतं हेच कळत नाही ना? म्हणूनच सांगते आयुष्यात एकदा तरी हम्पीला भेट देऊन या. जगण्याची नवी दिशा तर सापडेलच आणि आयुष्यात तुम्हाला नक्की काय हवंय या गुंत्यात सापडले असाल तर तो गुंता सोडवण्यासाठी या अविस्मरणीय संध्याकाळ आणि हम्पीवासियांच्या स्वभाव गुणाची मदत होईल.

    हॉटेलवर जाण्याआधी मार्केटला फेरफटका मारला. फेरफटकट्यात प्रत्येक दुकानदाराच्या बोलण्यात एक वाक्य सारखं होतं. ‘’अरे मॅडम हम्पी आये हो तो, खूश होकर जाओ ! यहाँ से सिर्फ खुशीयाँ लेकर जाना !

  या त्यांच्या संवादातून हम्पी वासियांच्या उदार, मनमिळाऊ, coolness स्वभावाचा अंदाज येतो.



Be Hampi, Live Hampi !!!!


  
                                                                                                       To Be Contiuned.....


  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ट्यूज डे विथ मॉरी (Tuesday With Morrie) BOOK REVIEW

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

... पण 'तु हवा आहेस'