Posts

Showing posts from January, 2020
Image
            हम्पी मैं आपका स्वागत हैं !!!   ( भाग - 1-3)                  हम्पी... कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील अगदी छोटसं गाव. गाव छोटसं असलं तरी या गावात पाहण्यासारखं आणि घेण्यासारखं (जगण्याच्या दृष्टीने) बरंच काही आहे.     Hampi, Karanataka.                                                      हनुमानाचा जन्म याच गावात झाल्याने हनुमान, प्रभू श्रीराम यांच्याविषयी लोकांच्या मनात विशेष स्थान आहे. या गावात पोहचताच तुम्हाला बहुतेकजण भगव्या रंगाची कपडे परिधान केलेले दिसतील. आम्हालाही हे सगळं नवीन होतं. म्हणून  रिक्षावाल्या काकांना विचारलं. इथे लोक हनुमानाची विशेष पूजा करतात. साकडं घालतात. भगव्या रंगाचं शर्ट आणि लुंगी ३ महिने, वर्षभर घालू ; आमच्या पारड्यात तुझ्या कृपेची फुलं टाकण्याचा नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ही कपडे नदीत विसर्जित करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तुंगभद्रा नदी किनारी वसलेलं हम्पी.  इ.स. 1500 च्या    काळात हम्पी हे  जगातील सर्वात श्रीमंत शहर होतं.  जगभरातून व्यापारी सोनं, चांदी, हिरे खरेदी करण्यासाठी येत असल्याचा इतिहास आहे.