Posts

Showing posts from April, 2019

ते खोटं जरा खटकलंच...

                          ...तशी माझी 2 शिफ्ट सुरू होती. न्यूज चॅनलमध्ये कामाला असल्याने घरी निघण्याची वेळ रात्री 10 किंवा 10.30 ... ऑफिस तसं मेट्रो स्टेशनपासून अवघ्या 15    मिनिटांच्या अंतरावर असल्याने चालत जाण्याची सवय. असंच एकदा रात्री 10 च्या सुमारास अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीजवळून हेडफोनस लावून गाणी ऐकत होते. त्यामुळे गाण्यासोबत स्वत : ला इमॅजिन करत आणि हेडफोन्स लावल्यामुळे आणि स्वत : मध्येच गुंतुन गेले होते. तेवढ्यात एक जोडपं आपल्या चिमुरडीसह अचानक समोर आलं. काहीशा घाबरल्या आणि अस्वस्थ सारखे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. तसं मी कधीही कोणत्याही भिकारी किंवा रस्त्यात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीशी न बोलताच सावधगिरीने पुढे जाते. पण या वेळेस असं काहीच घडलं नाही. माझी पाऊलं काहीशी तिथेच थांबली... कदाचित त्यांच्यासोबत असलेल्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे...अन्   दीदी एक मदत करा या प्रश्नाने...      हेडफोन्स काढून मी त्यांना विचारलं काय झालं ?  काही हवंय का ?....  आमची गाडी चुकली. पैसेही संपलेत .  भूक लागली आहे. असं तो तरूण म्हणाला .  ( मार्गदर्शन किंवा सल्ले देण्याची मी म