लग्नाच्या नात्याकडून.... मैत्रिकडे
आज
फ्रेन्डशीप डे...
काय लिहावं याचा विचार करत
होते. कॉलेज ग्रूपवर लिहावं की मास्टर ग्रूप की रुम पार्टनर की बेस्ट
फ्रेन्डबद्दल...(एका बेस्ट फ्रेन्डबद्दल लिहावं तर
दुसरी म्हणायची मी नाही का?) लिहायलाही घेतलं. काही नवीन
लिहितोय वाटत नव्हतं. रटाळ आणि चघळलेले विषयावर लिहायलाही मूड येत नव्हता.
अचानक शेजारी राहणारे काका आणि
काकीं नजरे समोर आले. त्यांना दोन मुली. दोघींचीही लग्न झालीयेत. त्यामुळे काका-काकी
दोघं घरी एकटेच. पण काका-काकींना कधी वेळ घालवण्यासाठी कोणाची गरजही पडत नाही. ''हम काफी है एक दुजे के लिये''... त्यात
रिटायर्ड कपल.
रिटायर्ड होणाऱ्या माणसांपुढे अनेक प्रश्न
भेडसावत असतात. रिटायर्ड झाल्यावर काय करायचं की दुसरी नोकरी शोधायची की गावी
जायचं?? पण या आमच्या काका-काकींना बहुधा असे
प्रश्न पडलेच नसावेत. माझ्या मते हे दोघं एकमेकांचे आयुष्याचे सोबती असण्याआधी
चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या मैत्रिबद्दल लिहिण्यासाठी हा सगळा
अट्टाहास...
काका
-काकींच्या मैत्रिच्या प्रवासाला सुरु करण्याआधी त्यांच्या बद्दल थोडंसं........
इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेले, फेसबूक, ट्विटर, व्हाटस अॅप,
यु ट्यूबचे चाहते असणारे काका तर साफ-सफाई करण्याची भारीच हौस
असलेल्या आमच्या काकी पण काही कमी नाहीत. त्यांना सुद्धा यु ट्यूबवरुन नवनवीन
रेसिपी बनवण्याचा शौक आहे. मग तुम्ही पण करणार ना आमच्या काका-काकींशी दोस्ती??
'' मग त्यांच्या ३६ वर्षाच्या क्रिस्पी मैत्रिबद्दल नक्कीच वाचा.''
काकी तशा शांत आणि बोलगट स्वभावाच्या. काका
मात्र विरूध्द. रागीट, पटकन चिडणारे. (तेवढेच प्रेमळ पण बरं
का). पण त्यांच्या मैत्रिणीकडे यावरही उपाय आहेच. काका चिडचिड करायला लागले की
काकी एकदम 'सावधान-विश्राम्'. तसंही
मैत्रिमध्येही एकजण चिडला की दुसऱ्याने शांत रहावंच लागतं. हेच काका–काकींच्या आजपर्यंतच्या मैत्रिचं रहस्य.
अरेंज मॅरेज म्हटंल की पार्टनरची ओळख लग्नानंतरच होते. पार्टनरचा
स्वभाव, आवडी-निवडी, आचार-विचार लग्नानंतरच कळतात. माझ्या काका काकींबद्दल पण असंच काही आहे. काका–काकी त्यांच्या भांवडामध्ये मोठे. त्यामुळे त्यांची जबाबदारी
त्यांच्यावरच. तरीही त्यांनी आपल्या मैत्रितला ओलावा आणि एकमेकांच्या आवडी–निवडी आजपर्यंत जपल्या आहेत. हेच तर हवं असतं. आपल्या बेस्ट
फ्रेन्डकडून...हो ना?
काकींना लहाणपणापासून शिक्षणाची खूप आवड, खूप शिकावं, जॉब करावा, स्वावलंबी
बनावं अशी स्वप्नं होती. पण जॉब लागताच त्याचं लग्न जमलं. आता आपली स्वप्न धुळीस
मिळणार. लग्नानंतर कोण देणार जॉब करुन? आणि दिला जॉब करुन
तरी संसार सांभाळायचा, सासू–सासऱ्यांची
मनं जपायची, नवऱ्याचं मन जपायचं. काही हवं नको बघायचं. त्यात
घरातील कामं आलीच.
पण काका माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्याला अन्
माझ्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली. एवढंच नव्हे तर जॉब आणि संसार या दोघांची
सांगड घालायला त्यांनी शिकवलं. मित्र, आयुष्याच्या साथीदार
यासोबत प्रसंगी गुरुही झाले. या निखळ मैत्रित आपल्या अडचणीत मित्र वा मैत्रिणीने
आपला आधार बनावा एवढी माफक अपेक्षा असते. त्यामुळे काकींच्या हसमुख चेहऱ्याचं कारण
आज कळालं होतं.
काकी पेशाने नर्स आणि काका टाइम्स वृत्तपत्रात सेल्स
डिपार्टमेंटमध्ये. दोघांचे करिअर भिन्न. तर सांगायचा मुद्दा असा की हे दोघं
एकमेकांना आजच्या डिजीटल युगात एकमेकांना आपापल्या विषयात अपडेट ठेवत असतात. मग तो
मेडिकल विषय असो वा सामाजिक, राजकीय. या स्पर्धेच्या जगात
अपडेट रहाणं आवश्यक असतं मग ते रहाण्याच्या बाबतीत असो वा शिक्षणाच्याबाबतीत...
आमचे
काका – काकी पण यात कुठे कमी नाही बरं का...
काका – काकी कुठे फिरायला
निघाले की एकदम टिपटॉप. डिसेंट लूक. काकांचा ट्रेन्डिंग चष्मा, लाइट कलरचं शर्ट तर काकींना सिम्पल रहायलं आवडतं. साधी साडी. नाजूक ओठांवर
हलकी लिपस्टीक. पण मला प्रश्न पडायचा की काकी सिम्पल मग त्यांना लिपस्टीक कशी
आवडते? न राहून विचारलंच. ‘ह्मह्म,
काकांना आवडते ना म्हणून’...
मैत्रित जसा विश्वास, प्रेम,
आपुलकी, समजूतदारपणा आवश्यक असतो त्याप्रमाणे
आर्थिक व्यवहारही पारदर्शक असावा. 'मैत्री म्हणजे आरसा' असं त्याचं मत.
प्रत्येकाची एक साधी, सरळ अपेक्षा असते की आपल्या मित्र वा मैत्रिणीने काही न सांगताच आपलं मन
ओळखावं. सांगून तर परक्यालाही भावना कळतात. पण माझ्या शुंभागीला कधी सांगायची गरजच
पडली नाही. ती आज माझ्या आयुष्यात आहे म्हणूनच ‘’मी
माझ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकलो. आज fit and fine आहे. ‘बिन तुम्हारे मैं बिखर जाता’...
त्यांच्या बोलण्यावरुन सगळं काही सोपं, सरळ वाटंत
होतं. पण खरंच ‘मैत्री’ आयुष्य एवढं
सोप्पं करते का??
इतरांच्या फ्रेन्डशीपचे किस्से एकले, वाचले की असंच वाटतं. मला पण हवाय असा मित्र. असे मित्र/मैत्रिण आपल्या आजूबाजूला असतातही. फक्त गरज असते ओळखायची, उघड्या डोळ्यांनी बघायची... अनुभवायची....
''Happy Friendship day. Celebrate your life with your lovely friends.''
- Pradnya K. Agale.
- Pradnya K. Agale.
Comments
Post a Comment