... पण 'तु हवा आहेस'

प्रिय दादा,
   कसा आहेस?.. वेळेवर जेवतोस ना... आईला फोन का नाही करत रे...माहितीये ती जरा जास्त लेक्चर देते...पण करायचा रे..आपल्याशिवाय आहे तरी कोण तीला... थोडं व्हायचं बोर...
    हमहम्मम.... तुला कळलं असेलच मी का एवढी तुझी विचारपूस करतेय. हाहहाहा... रक्षाबंधन येतंय.... काय गिफ्ट देणार आहेस? तु काय तुझ्या चॉईसने आणू नको. मला काही आवडत नाही. त्यापेक्षा मी अॉनलाईन एक ड्रेस बघितला आहे. तो दे. आमच्या कॉलेजची पार्टी आहे रे... यावेळेस मी कोणत्या मैत्रिणीचा ड्रेस घालणार नाही आत्ताच सांगतेय. यावेळेस लवकर ये. जास्त सुट्टी काढ. आपण फॅमिली ट्रीप काढू...
       अरे एक ना...माझ्या मैत्रिणीच्या दादाने सुसाईड केलं तर का? म्हणे गर्लफ्रेन्डने त्याला प्रेमात धोका दिला...मग काय आत्महत्या करायची का? आत्महत्या हा काय एकमेव पर्याय आहे का?... दाद्या तुझं काही असेल तर आत्ताच सांग बाबा...माझ्याशी एकदा बोल...माहितीये मी लहान आहे तुझ्यापेक्षा पण तरी.

   तुझ्याशिवाय कोणी नाही रे आमचं. पप्पा पण आपल्याला सोडून गेले. त्यानंतर आईने आणि तुच माझा सांभाळ केलास. मला वाढवलं.
   आई मला शिक्षणासाठी पुण्याला पाठवत नव्हती पण तु आईला समजून सांगितलं म्हणून पाठवलं. त्यामुळे तु मला पप्पांसारखा आहेस रे. मी तुमच्या दोघांशिवाय नाही राहू शकत.
   एक वडिल आणि भाऊ या दोन्ही नात्याच्या जबाबदाऱ्या तु नेहमी पार पाडत आला आहेस. जसं एखाद्या मुलीसाठी तीचे वडिल तीच्यासाठी हिरो असतात ना तसाच तु माझ्यासाठी हिरो आहेस.
   

     तुला आठवतंय का... तु गावी येणार म्हणून आईने तुझ्यासाठी बेसन लाडू बनवले होते आणि मला फक्त 2-3 लाडू दिले. मी खाईल म्हणून... खूप राग आला होता मला होता तेव्हा आईचा आणि तुझा. दादा का येतो गावी..तु आला की आईचं माझ्याकडे लक्ष नसायचं....हम्महम...किती वेडी होती ना मी तेव्हा...पण आता मोठी झालीये बरं का...कळतं मला सगळं...
    आणि एकदा तर काय तु हट्टच धरुन बसलास सायकल हवी म्हणून. त्या मंग्याच्या वडिलांनी त्याला बर्थडेला सायकल गिफ्ट दिली. तर तु पण आईकडे हट्ट करायला लागलास मला पण सायकलहवी म्हणून. मग काय दिली आईने घेऊन. घरचा दिवटा ना त..... तुला माहितेय का आईने त्यावेळेस सायकलसाठी कूठून पैसे आणले होते? आईने पप्पांची अंगठी गहाण ठेवून सोनाऱ्याकडून उधारीवर पैसे आणले. मलाही नव्हतं माहित, मी चोरुन एकलं होतं आईला सोनाऱ्याशी बोलताना...
   
खूप काळजी करत असते तुझी. तसा तु सर्वगुण संपन्न आहे आईच्या मते. हुशार आहेस. कोणाशीही दोन हात करायची ताकद तुझ्यात आहे... पण शेवटी आईच ना ती...


     तुझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे पण मलाही कळतं... आई..बहिण..वडिल सोडून आयुष्यात कोणीतरी साथीदार हवा असतो...जो आपली काळजी घेईल.. आपल्या आई - बहिणीची काळजी घेईल...आयुष्याच्या सुख - दुखात साथ देईल.... आणि अशी एखादी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये येते पण... आपण तीच्यावर जीवापाड प्रेम करतो... जपतो... आपल्या सगळ्या सुख - दुखाच्या गोष्टी तीला शेअर करतो... आयुष्यभर एकत्र रहायचे स्वप्न रंगवतो... पण एक दिवस ती आपल्याला अर्ध्यातच सोडून जाते... अशा वेळी मनाची स्थिती काय होते समजू शकते...
  पण 3 वर्षाच्या प्रेमासाठी आपण आपल्या आई - वडिलांना नाही ना विसरु शकत. तु शिक्षणासाठी आणि नंतर जॉबसाठी जास्त वेळ मुंबईत असायचा. त्यावेळी आपल्या शिक्षणासाठी होणारी आईची तारेवरची कसरत...काळजी... प्रेम मी बघीतलं आहे ... तुलाही त्याची जाणीव आहेच. कधी कुणाची धुणी - भांडी...तर शिलाई कामही करायची...
  आईला तुझ्याकडून आणि माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तु माझा आदर्श आहेस. मलाही तुझ्यासारखंच मोठं व्हायचंय. तुझ्या पावालवर पाऊल ठेवायचंय.
   मला ना तुझं गिफ्ट पण नको... मी कधीच तुझी कम्पलेंट आईकडे करणार नाही...मला फिरायला पण नको नेऊस...मी घालेन माझ्या मैत्रिणीचा ड्रेस.... पण 'तु आम्हाला सोडून जाऊ नकोस'....   

                                                           तुझी लाडकी,
                                                               बहिण






                                                             प्रज्ञा आगळे
                                                                                                                                                                       
                                                              


Comments

  1. प्रिय ताई,
    'तु' देखील हवी आहेस...!!

    ReplyDelete
  2. Soo heart touching article

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

TRUST ME !