पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

मी मुंबईची.... पण माझं आणि पुण्याचं नातं तसं काहीसं वेगळंच... कारण माझं मास्टर इथेच झालं. हॉस्टेलला राहिले. त्यामुळे चांगल्या - वाईट आठवणी, गंमतीजमती, कडू -  गोड अनुभव मला पुण्याने दिले...आले तेव्हा नको वाटायचं पुणे... सगळंच काही स्लोली... पण हळुहळु मित्र / मैत्रिणी मिळाल्या...रुममेटशीही चांगली गट्टी जमली...पण  नुकतीच सुरु झालेली ही  'बॅचलर जर्नी'  आणि मास्टरचे 2 वर्ष कधी संपले कळलंच नाही... त्यानंतर अधूनमधून पुण्याला जायचे....       
        एकदा पुण्याला गेले असताना आमच्या रुममेट फेन्डसचा आईस्क्रीम खायला जाण्याचा प्लान ठरला... प्रत्येक जणी आपआपली फेवरेट आईस्क्रीम सांगू लागल्या. माझी सांगायची वेळ आल्यावर मला आठवले की मला माझ्या मित्राने तवा आईस्क्रीमबद्दल सांगितले होते. मी हे माझ्या फ्रेण्डसलाही शेअर केले. जाऊया म्हणून सगळ्यांनी गोंधळ घातला. पण ही तवा आईस्क्रीम खराडीत मिळते फक्त एवढंच मला माहित होतं. मला वाटलं हे सांगितल्यावर सगळ्यांची निराशा होईल. 7 वाजून गेल्याने सगळे नाही बोलतील. कारण कर्वेनगर ते खराडी दीड तासाचा प्रवास. त्यात यायला देखील वेळ होणार. पण सगळंच उलटं झालं. सगळ्या जणी जाण्यासाठी तयार झाल्या. मग काय निघाली स्वारी, तवा आईस्क्रीम खाण्यासाठी....   
        तिथे पोहचताच सगळ्यांनी आपआपली फेव्हरेट फ्लेव्हर  घेतले... सगळेच फ्लेव्हरची टेस्ट छान होती. या तवा आईस्क्रीमची स्पेशालिटी म्हणजे आपल्या समोर ही आईस्क्रीम बनवतात. आईस्क्रीम बनवायची पध्दतही वेगळी आहे. मी पहिल्यांदाच ही आईसक्रीम खाल्ली होती आणि बनवायची पध्दतही मला आवडली. म्हटलं याची स्टोरी केली तर....      शेवटी ठरवून टाकलं आपण ही स्टोरी करायची. तशी माझी स्टोरी करायची देखीलही पहिलीच वेळ होती...आईस्क्रीम शॉप मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. अॉफिसमध्ये सरांना विचारुन वेळ, तारीख ठरवली...        
      ठरल्याप्रमाणे आईस्क्रीम शॉपजवळ पोहचले. काय बोलायचं?, कशी सुरुवात करायची?, कोणते फूटेज घ्यायचे?, कोणाशी बोलायचे?, काय प्रश्न विचारायचे सगळं मनात ठरवलं होतं. पण अॉन कॅमेरा बोलायची पहिलीच वेळ होती त्यामुळे बोलू शकेन का? असा प्रश्न मनात डोकवून गेला. पण करायचं तर होतंच. 
       शूटची सुरुवात चांगली झाली होती...पण आईस्क्रीम मशीनची लाईट गेल्याने सगळा खोळंबा झाला... काही वेळाने लाईट आल्यावर परत शूटला सुरुवात केली. (तवा आईस्क्रीमचचा तवा थंड करण्यासाठी लाईट आवश्यक होती).... सारखी लाईट जात - येत असल्याने शूटमध्ये अडथळा येत होता त्यात शूट करायची माझी पहिलीच वेळ... त्यात ३-४ वेळा टेक... असं करत - करत  फायनली शूट आटोपलं. पण प्रश्न काही मनाला सोडवत नव्हते... कसं झालं असेल?, बोलली असेल का नीट?, चुकीचं तर नाही ना बोलली? असे अनेक प्रश्न मनात येत होते. विचार करतंच मुंबईत पोहचले.
दुसऱ्याच दिवशी स्टोरीही अॉन एअर गेली. बऱ्याच चूका झाल्या होत्या. बोलण्यात, कॅमेरा फेस करण्यात पण आनंदही होताच, आपण शोधलेली स्टोरी अॉन एअर गेल्याची...

आता थोडसं तवा आईस्क्रीमबद्दल....




कशी बनवली जाते तवा आईस्क्रीम?





  

थंड तव्यावर ही आईस्क्रीम बनवली जाते. ही संकल्पना मुळची मलेशियातली. काही खवय्यांनी या तवा आईस्क्रीमची रेसीपी शिकून महाराष्ट्रात आणली. या आईस्क्रीमचं मुळ नाव 'थाय आईस्क्रीम' आहे पण महाराष्ट्रात या आईस्क्रीमला 'तवा आईस्क्रीम' म्हणतात.... 'आपल्या सोयीनुसार नावं ठेवण्याची जागतिक परंपराच'....


 कुठे मिळेल तवा आईस्क्रीम?

पुण्यात खराडी येथे तुम्हाला ही आईसक्रीम टेस्ट करायला मिळेल... त्याशिवाय मुंबईतही तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत... 


     
चला तर मग येताय ना तवा आईस्क्रीम खायला ...  खालील लिंकवर क्लिक करा आणि आणखी काही गोष्टी जाणून घ्या 'स्पेशल तवा आईस्क्रीम बद्दल... 

https://youtu.be/PfvhjeXwlbY


                                                                              प्रज्ञा आगळे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ट्यूज डे विथ मॉरी (Tuesday With Morrie) BOOK REVIEW