ट्यूज डे विथ मॉरी (Tuesday With Morrie) BOOK REVIEW
मरायचं कसं हे ठरलं की माणूस जगायचं कसं हे शिकतो.
'ट्यूज डे विथ मॉरी' या पुस्तकातील ही ओळ अगदी मनापासून पटली आहे.
आजन्म शिक्षक असलेले मॉरी आणि त्यांचा आजन्म विद्यार्थी मिच यांची ही कथा...
![]() |
प्राध्यापक मॉरी आणि विद्यार्थी मिच |
या पुस्तकात कॉलेजमध्ये प्राध्यापकाला लागलेला विद्यार्थ्याचा लळा, वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची चर्चा, कॉलेज संपल्यानंतर तुटलेला संपर्क, पुन्हा काही वर्षांनी विद्यार्थ्याला अचानक आपल्या प्राध्यापकाला झालेली भेटण्याची इच्छा, नेमकं त्याचवेळेस मरणाच्या दारात असलेले प्राध्यापक यानंतर त्या दोघांमधील आयुष्य, प्रेम, करिअर, कुटुंब, मृत्यू या विषयांवर रंगलेली प्रदीर्घ चर्चा बरंच काही आपल्याला शिकवून जातात.
मृत्यू डोळ्यासमोर तरळत असताना आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे आणि समोरच्याला काहीतरी देण्याची भावाना असणारे मॉरी कुठे आणि आपण कुठे?
छोटुसं आयुष्य आहे रे भरभरून प्रेम करा, असं आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो.
पण आपला मृत्यू उंबऱ्यावर असताना आयुष्यावर प्रेम करणं कसं शक्य आहे यार??? अर्थात हा प्रश्न मलाही पडला.पण या पुस्तकात हेच तर गुपित आहे.
''एखादी घटना तुमच्या आयुष्याच घडली मग ती चांगली किंवा वाईट; मनसोक्तपणे जगा, अनुभवा पण त्यांत गुंतून राहू नका. पुढच्या अनुभवासाठी सज्ज व्हा'' खरंच आयुष्य एवढं सोप्पं आहे??
या पुस्तकाबद्दल मला जे वाटलं, माझ्या वैचारिक क्षमतेनुसार जे समजलं ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
कदाचित मिच आणि मॉरीची चर्चा तुमच्या जगण्याला वेगळा अर्थ देऊन जाऊ शकतात. त्यामुळे नक्की वाचा ट्यूज डे विथ मॉरी (Tuesdays with Morrie)
प्रज्ञा श्रीकांत वाळुंज
Comments
Post a Comment