हम्पी मैं आपका
स्वागत हैं !!!
(भाग - 1-3)
(भाग - 1-3)
हम्पी...कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील अगदी
छोटसं गाव. गाव छोटसं असलं तरी या गावात पाहण्यासारखं आणि घेण्यासारखं
(जगण्याच्या दृष्टीने) बरंच काही आहे.
Hampi, Karanataka. |
हनुमानाचा
जन्म याच गावात झाल्याने हनुमान, प्रभू श्रीराम यांच्याविषयी लोकांच्या मनात विशेष
स्थान आहे. या गावात पोहचताच तुम्हाला बहुतेकजण भगव्या रंगाची कपडे परिधान केलेले
दिसतील. आम्हालाही हे सगळं नवीन होतं. म्हणून रिक्षावाल्या काकांना विचारलं. इथे लोक
हनुमानाची विशेष पूजा करतात. साकडं घालतात. भगव्या रंगाचं शर्ट आणि लुंगी ३ महिने,
वर्षभर घालू; आमच्या पारड्यात तुझ्या कृपेची फुलं टाकण्याचा
नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ही कपडे नदीत विसर्जित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
तुंगभद्रा नदी किनारी वसलेलं हम्पी. इ.स. 1500 च्या काळात हम्पी हे जगातील सर्वात श्रीमंत शहर होतं. जगभरातून व्यापारी सोनं, चांदी, हिरे खरेदी करण्यासाठी येत असल्याचा इतिहास आहे.
Tungabhadra River, Hampi. |
पण हम्पीचं आकर्षण मला तरी एक वेगळ्या
कारणामुळे वाटलं. ते म्हणजे तिकडचं उत्साही वातावरण, शांतता, स्वच्छता. हम्पीतील
गावकरी आपल्या कामाशी आणि ग्राहकाशी प्रामाणिक आहेत तसेच ते वेळेबाबत Punctual आहेत. इथे मला एक किस्सा शेअर करायला आवडेल.
मुंबईत किंवा काही पर्यटनस्थळी वा कुठेही जायचं असल्यास आपण ड्रायव्हरला
वेळेच्या आधीचीच वेळ देतो. कारण लोकं दिलेली वेळ पाळतीलच असे नाही. आम्ही साधारण
सकाळी पावणे दहाच्या सुमारास होस्पेट शहरात उतरलो.(हम्पी गावात पोहचण्यासाठी होस्पेटला
उतरावं लागतं. तिथून 13 किमी अंतरावर हम्पी
गाव आहे.) होस्पेटला पोहचण्याचा अंदाज घेऊन आमच्या रिक्षावाल्या काकांना वेळेच्या
आधीच पोहचण्यास सांगण्याचं ठरवलं होतं. पण झालं असं की The Hampi Dream Tripच्या नादात तिघीही विसरलो. म्हणटलं झालं आता इथेच
आपला अर्धा तास तरी वाया जाणार. बसमधून उतरताच रिक्षावाले काका समोर दिसले. अगदी
जीव भांड्यात पडला... Thank
god म्हणत रिक्षात बसलो. आणि काकांना विचारलं वेळेत आलात. आम्ही फोन करायचो विसरलो होतो म्हणत त्यांच्याशी
संवाद सुरू केला.
मुंबईवरून येणाऱ्या गाडीच्या वेळेचा मला अंदाज
आहे. ती 10 च्या सुमारास पोहचत असते त्यामुळे मी 9.30
वाजता इथे येऊन थांबलो होतो. म्हणटलं अरे वा!! काका
आपल्यापेक्षा 2 पाऊल पुढे निघाले...
Start our Dream Trip |
Finally आमच्या तिघींच्या ड्रीम ट्रीपला सुरुवात झाली
होती. हळू-हळू हॉस्पेट शहर मागे टाकत हम्पी गावात शिरत
होतो. वातावरणात वेगळाच उत्साह, शांतता, गारवा जाणवत होता. 15 तासांच्या
प्रवासानंतरही थकवा अजिबात जाणवत नव्हता.(कदाचित ट्रीपच्या excitement मुळेही असू शकतो.)
हॉटेल मालकाशी आधीच बोलणं
झालं होतं. त्यामुळे त्याने रुम स्वच्छ करून ठेवलीच होती. महिनाभर आधी बुकींग
केल्यामुळे हॉटेल मालक (आता आमचा शिवा bro ) advance साठी मागे लागला होता. पण रूमवर पोहचताच देऊ
म्हणत आम्ही टाळाटाळ करत होतो. फ्रेश न होताच त्याला पैसे advance द्यायला लागलो. ‘अरे
मॅडम पहले फ्रेश हो जाओ. बादमे देना. म्हणत तो निघून गेला. म्हणटलं अरे वा, किरकिर करणारा वाटला होता पण त्याच्या या सोज्वळ
वागणुकीमुळे आणि बोलण्याने त्याच्या विषयीचं मत बदललं. (मी इथे मुद्दामच हा किस्सा नमूद केला कारण हम्पी
गावकऱ्यांच्या वागणुकीतली वेगळी speciality तुमच्याशी शेअर
करायची आहे. पुढे असेच काही किस्से सांगेन जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल.)
Virupaksha Temple, Hampi. |
ओम साई हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो.
मार्केटमध्येच हॉटेल असल्याने फिरण्याच्यादृष्टीने अगदी मोक्यावर. त्यामुळे ट्रीपच्या
पहिल्या दिवशी जवळपासची ठिकाणं चालतंच फिरायचा विचार होता. हॉटेलपासून अवघ्या २
मिनिट अंतरावर विरूपक्ष मंदिर आहे. मंदिराच्या जवळपास Sasivekalu आणि Kadalekailu अशी 2
गणपतीची मंदिरं, कृष्णा मंदिर, कृष्णा बाजार, बडा विलिंगा, नरसिंहाची मोठी मूर्ती
आपल्याला पहायला मिळते.
Kadalekalu Ganesha |
Narsimha |
Krishna Temple |
इथे बराच वेळ फिरल्यानंतर 1.5 किमी अंतरावर अंडर ग्राउंड मंदिर, हजारा रामा मंदिर, महा नवमी डिब्बा, पुष्करणी बघण्यासाठी रिक्षा केली.(तुम्ही स्कूटर, सायकलही भाड्याने घेऊ शकता किंवा चालण्याची तयारी असेल तर चालतही फिरू शकता.)
हम्पीत फिरताना तुम्हाला मोठ्या दगडी कमानी...छोटी-छोटी मंदिरं, टेकड्या, माळरान दिसतील. हे सर्व काही पाहताना तुम्हाला हम्पीच्या दिव्य भव्य साम्राज्याचा अनुभव येईल.
इ.स.
1565च्या युद्धात हम्पीतील अनेक देवळे, पुतळे, अलिशान घरे यांचा नाश झाला. आगी
लावून राजवाडे जाळण्यात आले. देशभरात नावलौकीक असणाऱ्या श्रीमंत शहाराचा ऱ्हास
झाला.पण तरीही त्याच जोमाने अन् नव्या उमेदीने शिल्लक राहिलेल्या वास्तू खास दिमाखात आपलं स्वागतार्ह आजही उभ्या आहेत.
देशभरातून नागरिक इथे भेट देतात. मात्र भारतीय
पर्यटकांची संख्या परदेशी नागरिकांच्या तुलनेत तशी कमी.एखाद्या ठिकाणाचं पर्यटन
वाढवणं आणि शान राखणं नागरिकांच्याच हातात असतं. त्यामुळे आपण हम्पीतील पर्यटन वाढवायला
मदत करायला हवी. जेणेकरून शेती व्यतिरिक्त पर्यटनाच्या जोरावर तेथील नागरिक आपली
आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आदी प्रगती करू शकतील. आणि पुन्हा एकदा हम्पी देशाच्या
नकाशावर ठळकपणे अभिमानाने उभे राहील.
view form Malyavanta hill, Hampi. |
आम्हाला
संध्याकाळ माल्यवंता हिलवरच घालवायची होती. म्हणून दिवसभराचे सगळे पॉईंटसच उरकून
माल्यवंता हिलवर गेलो. हिलवरून चोहीकडे पसरलेली भात आणि केळीची शेती...शेतीचं हिरवं-पिवळ्या
रंगाचं रूप तर मध्येच कुठेतरी दगडांचे डोंगर आणि त्यावर सूर्यास्ताची हळू-हळू ओढली
जाणारी चादर... सारं काही डोळ्यांच्या कॅमेऱ्यात टिपावसं वाटतं. ‘’बस्स, अब यहा से कही नही जाना हैं! आज की रात यही गुजारनी हैं !’’ असा स्वत:शीच हट्ट करावासा वाटतो.
ट्रीपच्या पहिल्या दिवसाची संध्याकाळ खूपच छान गेली होती. रोजच्या धकधकीच्या
जीवनातून थोडासा विसावा. काही वेळानं सूर्यास्तचा निरोप घेतला आणि जड पावलांनी हॉटेलच्या
दिशेने निघालो.
सध्याची वाढलेली गुन्हेगारी बघता हम्पीला येण्याआधी
मनात थोडीशी भीती होती. सुरक्षित असेल ना ? हॉटेल कसं असेल ? आजू-बाजूचा परिसर कसा असेल ? पण हे सगळे प्रश्न रिक्षावाल्याला आणि हॉटेल
मालाकाला भेटून नंतर कुठे गायब झाले कळलंच नाही. आणि हो महत्त्वाची गोष्ट तुम्ही
हम्पीमध्ये रात्री उशिरा सुद्धा एकट्या मुली फिरू शकता. एवढं हम्पी सुरक्षित आहे. आणि त्यांचा आपलेपण या वातावरणासह त्यांच्यामध्ये देखील आहे.
Don’t Worry, Go Hampi, Safe Hampi...!!
Pradnya K. Agale.
To Be Continued......
👌 chalo hampi😃
ReplyDeleteSuper blog prags 😘...chal firse jate hai...tera ye blog padke Hampi Ko miss kar Rahi hu 😁
ReplyDelete