माझं दुसरं प्रेम
कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनाविरोधात निर्णय घ्यावे लागतात. एखाद्या गोष्टीत मन अडकत असताना, त्या गोष्टीशी जडलेल्या प्रेमाची चाहूल लागत असतानाच मन घट्ट करुन निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळेस मनाची झालेली घालमेल शब्दात मांडणं माझ्यासाठी तरी खूप अवघड आहे. वर्षाभरापूर्वी जय महाराष्ट्र चॅनल जॉईन केलं. अन् कधी कंपनीच्या आधी तिकडच्या माणसांशी होऊन गेले कळलंच नाही. आपण नेहमी म्हणतो परत एकदा शाळा, कॉलेजचे दिवस अनुभवायला मिळावे. मात्र ते मिळतातच असे नाही. पण इथे पुन्हा मला दोन्ही अनुभव जगायला मिळाले. फक्त फरक होता त्यावेळेसच्या मस्ती..मजाक..जोक्स आणि मित्र -मैत्रिणींमध्ये. तेव्हा जरा बालीश मस्ती..जोक्स आता थोडे वयात आलेले एवढंच 🤣🤣🤣 शाळेसारखं ऑफिसमध्ये आल्यावर एकमेकांना पहिला प्रश्न विचारणं, आज डब्ब्यात काय आणलंय ? बातम्या मोजण्यासाठी हातासह पायांचा उपयोग करणं, एकमेकांचा वेळोवेळी अपमान करणं, मुद्दाम खोडी काढणं, जुने वाद उखरुन काढणं, पेन ढापला म्हणून भांडणं. पण तितक्याच आपुलकीनं बुलेटीनच्या वेळेस ऐकमेकांना मदत करणं. 😍😍
सुरुवातीला Amruta Abhyankarअमृताचं तुझं गॉडी गॉडी बोलणं एकलं की डायबेटीस होईल की काय असं वाटायचं 😂😂.नंतर सवय झाली तुझ्या अशा बोलण्याची, वागण्याची. पण तुझ्या गॉडी..गॉडी बोलण्यामागे तुझं खोडकर रुप हळूहळू समजायला लागलं. फिर समजा तु तो अपनी जैसी ही है ! (माझी, पूनमची मस्ती दिसून येते तुझी दिसून येत नाही हाच काय तो फरक) 😎😎 वेबसिरीज, शॉपिंग, खाणं..फिरण्यावरुन रंगलेल्या गप्पा-गॉसिप आता कमी होईल..माझं रोहित पवार आणि धैर्यशिल माने प्रेम शेअर करायला तु नसशील (पण तु आठवणीने त्यांचे बाईट जास्त सेंकदाचे काढशील) बर्थ डेला एकेमेकींना दिलेली पार्टी..आपलं फोटो शूट..आणि स्पेशली माझ्या शेवटच्या दिवशी तु लिहिलेलं पत्र..इअररिंग्स..ज्वेल्वरी बॉक्स माझ्यासाठी खूप स्पेशल राहिल..अरेच्चा एक किस्सा विसरलेच.. तुझ्या बॅगसारखीच बॅग घेण्यासाठी दुकानदाराशी केलेला जुगाड कशी विसरेन ? आपला जुगाड ऑफ द फ्रेन्डशीप.. बाकी माझे टोमणे मनावर घे. तु कॉल नाही केला तरी मी करेन. कारण माझी बडबड ऐकायला अजून तरी कोणी मला मिळालं नाहीये. त्यामुळे तुला अजून काही दिवस मला सहन करावं लागणारेय. So be ready sweetheart.😘.
Poonam Pendurkar पूनमबद्दल तर बोलायला नको. सेम स्वभावाचे अतरंगी..आघाव...मस्तीखोर लोक एकत्र आले की काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपण दोघी. जवळ-जवळ पीसी मिळाले की रंगलेल्या आपल्या गप्पा, गॉसिप, दोघींनी मिळून सगळ्यांची खेचणं, सीनिअरसलाही न सोडणं. तेही त्यांच्या समोरच त्यांची घेणं मिस करेन गं... ऑफिसमधील प्रत्येकांचं तारक मेहता सिरिअलमधील कॅरेक्टरवरुन केलेलं नामकरण...कैस भूल सकती हू ! पण हे सारं काही आता परत होणार नाहीये कारण आपण आता एकत्र नसू. पण ठीकये अंबानीची मेट्रो मिला दे गी हमे. नवीन ऑफिस जॉईन केल्यानंतर पहिल्याच दिवशी Unexpected पणे झालेली आपली भेट..गळाभेट..आणि त्यानंतर घाबरलेले बिचारे इतर प्रवासी.😄😄😄खूप वेड्यासारखी मस्ती केली आपण hope so पून्हा अनुभवायला मिळो.
Amit Raneअमित राणेबद्दल काय बोलणार...’so called निरागस तु’. ऑफिसमध्ये नवीन असताना तुला पहिल्याच दिवशी कामाला लावलेला क्षण आणि ही आज आली मला कामाला लावते असा तुझा झालेला इगो हर्ट... रोड क्रासिंग वेळेस अचानक आलेली गाडी पाहून मम्मे ओरडणारा तु...ऑफिसमध्ये चूक नसतानही चूक काढली की सिनिअरसलाही न सोडणारा...शाळेसारखे पानचट जोक्स मारणारा...(पण तुझ्या जोक्सवर हसायला यायचं😊) ... घाटी वि. कोकणी मसाल्यवरुन रंगलेलं वॉर त्यात मध्येच ओमकार राजाध्यक्षांची बॅटिंग असे सारे किस्से भन्नाट होते. मी जाण्याच्या वेळेस भावूक झालेला तु ..दुनिया गोल है परत भेटूच अशी सोज्वळपणे मी केलेली कंमेट 😐आणि त्यावर याचंच तर टेन्शन आहे म्हणून माझा माझा केलेला अपमान मी विसरली नाहीय. याचा बदला राहिलाय घ्यायचा ओके.😛 आणि हा FB ..INSTAGRM पोस्ट लाईक..कंमेट करत जा. नाहीतर तुला माहितच आहे...माझ्याशिवाय तुझा फॅन क्लब कोणीही वाढवू शकणार नाहीये.😜😜
Avesh Tandaleआवेश के लिए क्या लिखना...तु तो भाईजान है..😍.और हमेशा रहेगा. पण लग्नात गिफ्ट आण नाही तर तुला जेवण मिळणार नाहीये. इथे तुझ्या बहना कार्डचा काही उपयोग होणार नाहीये.
Dear Janhavi BhatkarJanhvi Bro, आज तरी होणारे का ? प्रज्ञा आपण काही तरी करायला हवं असे रोज कानावर पडणारे तुझे प्रश्न आता ऐकायला मिळणार नाहीये. सोबत नसलो तरी ओव्हर एक्सायटेड अंडा करी मिस कर..आणि हा आपले फेक कॅन्डेड फोटो काढायला वेळात वेळ काढून भेटत जाऊ.
Omkar Rajadhyakshaओमकार अजूनही तुझा डबा मिस करतेय. आणि मोबाईल रिपेअर दुकानाचा विचार कर. 😁😁
Archana Hire अरे आर्ची आली रे... 😀😀😀हाहाहाहाहाह.... तुझं बुलेटीनच्या वेळेस उडालेली धावपळ बघायला आणि त्यावर कंमेट पास करण्याची संधी मला मिळणार नाहीये. सर काय चुकलं म्हणत (😉😉😉मी इथे नाव घेऊ इच्छित नाही तुला कळालं असेलच) काढलेली समोरच्याची खरडपट्टीचा किस्सा कायम लक्षात राहिल. आणि हा आता तु संप केला तरी चालेल.
Shailaja Shashikant Jogalशैलजा त्या Nitin Sawant नितिन सावंताचं दु:ख काही वेगळंच गं.. ३२ व्या मजल्यावर राहणाऱ्या माणासाचं रडगाणं. त्यांनी आपली केलेली रॅगिंग आपण विसरायची नाहीये आणि त्यांनाही विसरुन द्यायची नाहीये..
Samiksha Shirgaonkar मॅन होलमध्ये जाऊन अचानक गायब झालेला पाय..मोठ्ठा खड्डाचा पाडला गं तु..Pallavi Divekarपल्लवीची कचरपचर..मिस करेन..Abhi Pardheअभिलाष द मजून भाई...विशाल सर आणि तुझी चाललेली खलीबली..पल्लवीने अजिंक्य सरांना वेड्यात काढलेलं त्यानंतर Komal Pawar कोमल पवार आणि मी केलेली मस्करी मिस करेन... वेड्यात काढलं ओ Ajinkya Bhatambrekar अजिंक्य सर तुम्हाला 😁😁😁
Comments
Post a Comment