TRUST ME !


         

    या कॉर्पोरेटच्या पॉलिटिकल दुनियेत स्वत:मधलं 'मी'... बालपण... खोडसळपणा  अन् कुठेतरी स्वत:लाच विसरायला लागतो. स्वत:मधल्या खुबी विसरतो. (मला तरी असं वाटतं). त्यात स्वभाव दिलखुलास असेल तर काय ते पॉलिटिक्स कळायलाही उशीर लागतो आणि जेव्हा कळतं तेव्हा मनाची गुंतागुंत वाढतंच जाते. हे असंच का ? तसंच का ? असं का करायचं ? जो है सो है ! उगाच का आव आणायचा ? असे बरेच्च प्रश्न. शेवटी ठरवतोच. आपण 'सो कॉल्ड कॉर्पोरेट पॉलिटीक्स'पासून लांब राहू. राहण्याचा प्रयत्नही करु लागतो. स्वत:ला प्रत्येक क्षणी प्रूफ करत असतो. पॉझिटीव्ह ठेवत असतो. YES I CAN DO IT वाली फिलिंग आणतो. पण कधी ना कधी याचा अतिरेक होतोच. चिडचिड...डिप्रेशन...हताश... होतोच. पण या सगळ्यापासून लांब रहायचं असेल, HAPPY-WAPPY लाईफ जगायची असेल तर कोणत्याही प्रसंगी स्वत:वर विश्वास ठेवणं खूप्प्प गरजेचं आहे. आपल्यात काही कमी नाही. मी सुद्धा हे करू शकते/ शकतो.  हा ATTITUDE ठेवणं  तसेच  'विश्वास' हा शब्द मनात बिंबवणं गरजेचं आहे

      अशाच काहीशा घटना  'चॉपस्टीक' सिनेमामध्ये अभिनेत्री मिथिला पालकरसोबत घडताना दिसतात. बॉसचं टार्गेट असणं, आपल्या बद्दलचं गॉसिप एकू येणं, आजूबाजूच्या लोकांनी जाणून-बुजून IGNORE करणं. स्वत: विषयी आणि कामाविषयी अविश्वास दाखवणं. हे सगळं कुठे तरी खटकतं. नेगेटिव्ह फिलींग. Feelling Like Failure स्टेटस टाकण्याची इच्छा होते. यात आपल्या नावातंच खोट असेल तर मग विचारुच नका.  (सिनेमामध्ये मिथिला निरमा नावाच्या मुलीची भूमिका करतेय. नावावरुन  लोक तीची मस्करी करत असतात) मग तर स्वत: वरच हसण्याशिवाय पर्यायच उरत नाही.अशा ऑफिसच्या टेन्शनमध्ये स्वत:लाच गिफ्ट केलेली नवी कोरी गाडी घेतलेल्या दिवशीच हरवली तर.....


निरमाला तीची गाडी मिळते का ? तिचा स्वत: वरचा CONFIDENCE जागा होतो का ?  तिची या सगळ्यात कशी धांदल उडते? आणि हो  तुम्हालाही लाईफमधून थोडं रिलीफ  किंवा लाईफमध्ये हलकं-फुलकं INSPIRATION हवं असेल तर नक्की पाहा.. 'चॉपस्टिक'

  ('आयुष्यात  प्रत्येक गोष्ट परेफक्ट  मिळतेच असे नाही' असा फुकटचा सल्ला कोणीतरी तुम्हाला दिला असेलच. पण कसं आहे की आपल्याला 'हव्या असलेल्या गोष्टीला आपण नक्कीच परफेक्ट बनवू शकतो' किंवा 'निदान प्रयत्न तरी नक्कीच करु शकतो' त्यामुळे DON'T WORRY शेवटी काय TRUST महत्त्वाचा.)

                                                   
                                              Pradnya K. Agale.

            

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ट्यूज डे विथ मॉरी (Tuesday With Morrie) BOOK REVIEW

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

... पण 'तु हवा आहेस'