#Beingस्वच्छंदी
प्रत्येकाला स्वच्छंदी आयुष्य जगण्याची हौस असते म्हणा किंवा स्वप्न
असतं, इच्छा
असते. मग मुलगी असो वा मुलगा. पण ते प्रत्येकालाच जगता येईल असं नसतं. मुलांना
काही प्रमाणात जगताही येतं किंवा जगतातही. मुलं स्वच्छंदी जगण्याची इच्छाही बोलून
दाखवतात. पण मुलींनी
इच्छा बोलून दाखवणंही पाप. आणि मुलींनी जगायचं ठरवलं तरी अनेक बंधनं पायात बेड्या
ठोकून असतातच. अशाच काही मुलींच्या स्वप्नांची प्रतिनिधित्वं करणारी #MovingOut ही
वेबसिरीज....
‘मुव्हींग आऊट’ या
वेबसिरिजमध्ये स्वच्छंदी जगणाऱ्या नायिका रेवाची (अभिज्ञा भावे) ही कथा आहे. लग्न
म्हणजे आयुष्य मानणारा समाज, लग्नासानाठी आई – वडिलांचा
दबाव, घाई, काळजी तसेच स्वत:ला मॉड
म्हणवून घेणारे उच्च शिक्षित, चांगल्या कॉर्पोरेट
कंपन्यात जॉब करणाऱ्या तरुणांचे विचार पाहून नायिकेची अस्वस्थता त्यात स्वत:च्या विचारांसाठी हवी
असलेली मोकळीक, स्वच्छंदी जगण्यासाठी असलेली उर्मी नायिकेला गप्प बसू देत नाही.
त्यामुळे ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेते.
यानंतर
तीला हवं तसं घर मिळतं का? की मैत्रिणीच्या घरी राहते?तीच्या घरचे
पुन्हा तिच्याशी संपर्क साधतात का? रेवा परत घरी जाते का? तीची
फर्स्ट प्रायोरीटी असलेलं करिअर...तिचे आई -वडील समजून घेतात का? यासाठी
वेबसिरीज बघावी लागेल. तिच्या स्वप्नांचा, तिच्या OUT OF THE BOX असणाऱ्या
विचारांचा, मतांचा
प्रवास तसेच नायिकेचं स्त्रीवादी असणं, तिचा
स्ट्रेट फॉर्वड स्वभावही बघण्यासारखा आहे.
आजच्या समाजाच्या
चौकटीबाहेर जाऊन बनवलेली वेबसिरीजने काही एपिसोडमध्येच प्रेक्षकांची मनं जिंकली
आहेत. मराठीत प्रथमच असा प्रयोग करण्याता आला आहे. सिरीजमधील नेटिझन्सच्या
वापरातील भाषा प्रेक्षकांना आकर्षित करते, सिरीजचं टायटल साँगही बरंच काही सांगून जातं. तसेच
अभिनेत्रीचे उत्तम संवाद फेक, डिसेंट ड्रेसिंग, अभिनय, हावभाव
भाव खाऊन जातात.
- Pradnya K. Agale.
Comments
Post a Comment