Posts

Showing posts from 2019

माझं दुसरं प्रेम

Image
      कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनाविरोधात निर्णय घ्यावे लागतात. एखाद्या गोष्टीत मन अडकत असताना, त्या गोष्टीशी जडलेल्या प्रेमाची चाहूल लागत असतानाच मन घट्ट करुन निर्णय घ्यावा  लागतो. अशा वेळेस मनाची झालेली घालमेल शब्दात मांडणं माझ्यासाठी तरी खूप अवघड आहे. वर्षाभरापूर्वी जय महाराष्ट्र चॅनल जॉईन केलं. अन् कधी कंपनीच्या आधी तिकडच्या माणसांशी होऊन गेले कळलंच नाही. आपण नेहमी म्हणतो परत एकदा शाळा, कॉलेजचे दिवस अनुभवायला मिळावे. मात्र ते मिळतातच असे नाही. पण इथे पुन्हा मला दोन्ही अनुभव जगायला मिळाले. फक्त फरक होता त्यावेळेसच्या मस्ती..मजाक..जोक्स आणि मित्र -मैत्रिणींमध्ये. तेव्हा जरा बालीश मस्ती..जोक्स आता थोडे वयात आलेले एवढंच 🤣🤣🤣 शाळेसारखं ऑफिसमध्ये आल्यावर एकमेकांना पहिला प्रश्न विचारणं, आज डब्ब्यात काय आणलंय ? बातम्या मोजण्यासाठी हातासह पायांचा उपयोग करणं, एकमेकांचा वेळोवेळी अपमान करणं, मुद्दाम खोडी काढणं, जुने वाद उखरुन काढणं, पेन ढापला म्हणून भांडणं. पण तितक्याच आपुलकीनं बुलेटीनच्या वेळेस ऐकमेकांना मदत करणं. 😍😍    सुरुवातीला Amruta Abhyankarअमृताचं तुझं गॉडी गॉड

TRUST ME !

Image
              या कॉर्पोरेटच्या पॉलिटिकल दुनियेत स्वत:मधलं 'मी'... बालपण... खोडसळपणा  अन् कुठेतरी स्वत:लाच विसरायला लागतो. स्वत:मधल्या खुबी विसरतो. (मला तरी असं वाटतं). त्यात स्वभाव दिलखुलास असेल तर काय ते पॉलिटिक्स कळायलाही उशीर लागतो आणि जेव्हा कळतं तेव्हा मनाची गुंतागुंत वाढतंच जाते. हे असंच का ? तसंच का ? असं का करायचं ? जो है सो है ! उगाच का आव आणायचा ? असे बरेच्च प्रश्न. शेवटी ठरवतोच. आपण 'सो कॉल्ड कॉर्पोरेट पॉलिटीक्स'पासून लांब राहू. राहण्याचा प्रयत्नही करु लागतो. स्वत:ला प्रत्येक क्षणी प्रूफ करत असतो. पॉझिटीव्ह ठेवत असतो. YES I CAN DO IT वाली फिलिंग आणतो. पण कधी ना कधी याचा अतिरेक होतोच. चिडचिड...डिप्रेशन...हताश... होतोच. पण या सगळ्यापासून लांब रहायचं असेल, HAPPY-WAPPY लाईफ जगायची असेल तर कोणत्याही प्रसंगी स्वत:वर विश्वास ठेवणं खूप्प्प गरजेचं आहे. आपल्यात काही कमी नाही. मी सुद्धा हे करू शकते/ शकतो.  हा ATTITUDE ठेवणं  तसेच  'विश्वास' हा शब्द मनात बिंबवणं गरजेचं आहे .        अशाच काहीशा घटना  'चॉपस्टीक' सिनेमामध्ये अभिनेत्री मिथिला पालकरस

ते खोटं जरा खटकलंच...

                          ...तशी माझी 2 शिफ्ट सुरू होती. न्यूज चॅनलमध्ये कामाला असल्याने घरी निघण्याची वेळ रात्री 10 किंवा 10.30 ... ऑफिस तसं मेट्रो स्टेशनपासून अवघ्या 15    मिनिटांच्या अंतरावर असल्याने चालत जाण्याची सवय. असंच एकदा रात्री 10 च्या सुमारास अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीजवळून हेडफोनस लावून गाणी ऐकत होते. त्यामुळे गाण्यासोबत स्वत : ला इमॅजिन करत आणि हेडफोन्स लावल्यामुळे आणि स्वत : मध्येच गुंतुन गेले होते. तेवढ्यात एक जोडपं आपल्या चिमुरडीसह अचानक समोर आलं. काहीशा घाबरल्या आणि अस्वस्थ सारखे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. तसं मी कधीही कोणत्याही भिकारी किंवा रस्त्यात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीशी न बोलताच सावधगिरीने पुढे जाते. पण या वेळेस असं काहीच घडलं नाही. माझी पाऊलं काहीशी तिथेच थांबली... कदाचित त्यांच्यासोबत असलेल्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे...अन्   दीदी एक मदत करा या प्रश्नाने...      हेडफोन्स काढून मी त्यांना विचारलं काय झालं ?  काही हवंय का ?....  आमची गाडी चुकली. पैसेही संपलेत .  भूक लागली आहे. असं तो तरूण म्हणाला .  ( मार्गदर्शन किंवा सल्ले देण्याची मी म