BOOK REVIEW - 'बकुळा'
काही पुस्तकं नकळतपणे मनाला चटका लावून जातात , विचार करायला भाग पाडतात . प्रेम , त्याग , अस्तित्व , स्वातंत्र्याची जाणीव करुन जातात ... अशीच काहीशी ‘ बकुळा ’ ही लघुकादंबरी . जात , धर्म , स्वाभिमान आणि दोन कुटुंबातील वैमनस्यात वाढलेले ‘ ती आणि तो ’ . दोघंही हुशार , बुध्दीवान , स्वप्नाळू . तो आणि ती प्रेमात पडतात . दोन्ही कुटुंबांच्या घरामध्ये उभे असलेलं बकुळा हे झाड , जसं दोन्ही घराच्या भांडणांचं साक्षीदार हे झाड आहे तसंच तो आणि तिच्या प्रेमाचा साक्षीदारही . घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघंही लग्न करतात . काटकसरीने आपला संसार उभा करतात . यशाच्या उंच शिखरावर त्याने पोहचावं म्हणून ती स्वप्नांचा त्याग करते . आपण मिळवलेल्या यशात तो स्वार्थी , Business minded बनतो . हे यश त्याला ‘ तीला ’ ही विसरायला लावतं . त्यागाच्या परिभाषेला जाणीव आणि प्रेमाची झालर नसेल तर स्वभाव आत्मकेंद्री बनतो . स्वातंत्र्य आणि स्वत : साठी आनंद मिळवण्याची इच्छा जागी होते . पण यात नात्य