Posts

Showing posts from July, 2017

... पण 'तु हवा आहेस'

Image
प्रिय दादा ,    कसा आहेस ?.. वेळेवर जेवतोस ना. .. आईला फोन का नाही करत रे .. .माहितीये ती जरा जास्त लेक्चर देते...पण करायचा रे..आपल्याशिवाय आहे तरी कोण तीला... थोडं व्हायचं बोर ...     हमहम्मम.... तुला कळलं असेलच मी का एवढी तुझी विचारपूस करतेय. हाहहाहा... रक्षाबंधन येतंय.... काय गिफ्ट देणार आहेस ? तु काय तुझ्या चॉईसने आणू नको. मला काही आवडत नाही . त्यापेक्षा मी अॉनलाईन एक ड्रेस बघितला आहे. तो दे. आमच्या कॉलेजची पार्टी आहे रे... यावेळेस मी कोणत्या मैत्रिणीचा ड्रेस घालणार नाही आत्ताच सांगतेय. यावेळेस लवकर ये. जास्त सुट्टी काढ . आपण फॅमिली ट्रीप काढू. ..         अरे एक ना...माझ्या मैत्रिणीच्या दादाने सुसाईड केलं तर का ? म्हणे  गर्लफ्रेन्डने त्याला प्रेमात धोका दिला...मग काय आत्महत्या करायची का? आत्महत्या हा काय एकमेव पर्याय आहे का?... दाद्या तुझं काही असेल तर आत्ताच सांग बाबा...माझ्याशी एकदा बोल. .. माहितीये मी लहान आहे तुझ्यापेक्षा पण तरी.    तुझ्याशिवाय कोणी नाही रे आमचं. पप्पा पण आपल्याला सोडून गेले. त्यानंतर आईने आणि तुच माझा सांभाळ केलास. मला वाढवलं.    आई मला शिक

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

Image
मी मुंबईची.... पण माझं आणि पुण्याचं नातं तसं काहीसं वेगळंच... कारण माझं मास्टर इथेच झालं. हॉस्टेलला राहिले. त्यामुळे चांगल्या - वाईट आठवणी, गंमतीजमती, कडू -  गोड अनुभव मला पुण्याने दिले...आले तेव्हा नको वाटायचं पुणे... सगळंच काही स्लोली... पण हळुहळु मित्र / मैत्रिणी मिळाल्या...रुममेटशीही चांगली गट्टी जमली...पण  नुकतीच सुरु झालेली ही  'बॅचलर जर्नी'  आणि मास्टरचे 2 वर्ष कधी संपले कळलंच नाही... त्यानंतर अधूनमधून पुण्याला जायचे....                एकदा पुण्याला गेले असताना आमच्या रुममेट फेन्डसचा आईस्क्रीम खायला जाण्याचा प्लान ठरला... प्रत्येक जणी आपआपली फेवरेट आईस्क्रीम सांगू लागल्या. माझी सांगायची वेळ आल्यावर मला आठवले की मला माझ्या मित्राने तवा आईस्क्रीमबद्दल सांगितले होते. मी हे माझ्या फ्रेण्डसलाही शेअर केले. जाऊया म्हणून सगळ्यांनी गोंधळ घातला. पण ही तवा आईस्क्रीम खराडीत मिळते फक्त एवढंच मला माहित होतं. मला वाटलं हे सांगितल्यावर सगळ्यांची निराशा होईल. 7 वाजून गेल्याने सगळे नाही बोलतील. कारण कर्वेनगर ते खराडी दीड तासाचा प्रवास. त्यात यायला देखील वेळ होणार. पण सगळंच उलटं झालं.