Posts

Showing posts from May, 2020

"२६/११ कसाब आणि मी" - BOOK REVIEW

Image
          26/11 .... मुंबईकरांसाठी काळा दिवस... या आठवणी मनाच्या कोपऱ्यात डोकवल्या तरी डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहत नाही. डोक्याच्या शिरा आपोआप ताणल्या जातात. शरीराचा एकूण एक अवयव पेटून उठतो. नुसता राग राग आणि राग येतो. पोटात गोळा येतो. मन अजूनही कुठेतरी घाबरतं. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. सूडाची भावना जागी होते. मग मनात सुरू होतो प्रतिशोध.....हो ना ??? पण शांत व्हा. आपण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत अतिरेकी कसाबला फासावर चढवण्यात आपलं पोलीस दल यशस्वी झालं आहे.     या दहशतवादी हल्ल्याचा तपासाचा अनुभव लेखक रमेश महाले यांनी "२६/११ कसाब आणि मी" या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने या घटनेतील अनेक बारकावे समोर येतात.    ही घटना घडत असताना सामान्य माणसापासून ते रेल्वे कर्मचारी, रहिवासी, पोलीस अधिकारी, शिपाई, हवालदार या सगळ्यांनी आपल्या देशाप्रती कर्तव्य चोखपणे पार पाडलं. जीवावर उदार होऊन अनेकांनी नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. आणि स्वत : चे प्राण दिले ही.   काही घटना कदाचित वृत्तपत्र, वाहिन्यापर्यंत पोहचल्या नसतील. पण लेख