
हम्पी मैं आपका स्वागत हैं! (भाग 2-3) ट्रीपचा दुसरा दिवस लवकरच सुरू करायचा म्हणून लवकरच झोपलो. कधी ऑफिसला लवकर न उठणाऱ्या आम्ही तिघी सकाळी 5 वाजताच उठलो. आज सकाळी विठ्ठल मंदिरात जायचं होतं. हम्पीमधलं पर्यटकांचं सर्वाधिक आकर्षक असलेलं पर्यटन स्थळ...विठ्ठल मंदिर. सहाजिकच आमचंही. विठ्ठल मंदिर हे फोटोजेनीक ठिकाण असल्याने आणि सकाळच्या वेळेस पर्यटकही कमी असतील म्हणून सकाळच्या वेळेस जाण्याचं ठरवलं. तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेल्या विठ्ठल मंदिरात ५६ खांब आहे. या खांबातून संगीत ऐकू येत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. मंदिराचे बांधकाम राजा कृष्णदेवराय यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाल्याची माहिती मिळते. या मंदिरात एक रथ, तुळशी वृदांवन, म्युझिकल पिलर तर मंदिराच्या मंडपात विष्णुचे अवतार कोरलेले पहायला मिळतात. ह...