माझं दुसरं प्रेम
कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनाविरोधात निर्णय घ्यावे लागतात. एखाद्या गोष्टीत मन अडकत असताना, त्या गोष्टीशी जडलेल्या प्रेमाची चाहूल लागत असतानाच मन घट्ट करुन निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळेस मनाची झालेली घालमेल शब्दात मांडणं माझ्यासाठी तरी खूप अवघड आहे. वर्षाभरापूर्वी जय महाराष्ट्र चॅनल जॉईन केलं. अन् कधी कंपनीच्या आधी तिकडच्या माणसांशी होऊन गेले कळलंच नाही. आपण नेहमी म्हणतो परत एकदा शाळा, कॉलेजचे दिवस अनुभवायला मिळावे. मात्र ते मिळतातच असे नाही. पण इथे पुन्हा मला दोन्ही अनुभव जगायला मिळाले. फक्त फरक होता त्यावेळेसच्या मस्ती..मजाक..जोक्स आणि मित्र -मैत्रिणींमध्ये. तेव्हा जरा बालीश मस्ती..जोक्स आता थोडे वयात आलेले एवढंच 🤣🤣🤣 शाळेसारखं ऑफिसमध्ये आल्यावर एकमेकांना पहिला प्रश्न विचारणं, आज डब्ब्यात काय आणलंय ? बातम्या मोजण्यासाठी हातासह पायांचा उपयोग करणं, एकमेकांचा वेळोवेळी अपमान करणं, मुद्दाम खोडी काढणं, जुने वाद उखरुन काढणं, पेन ढापला म्हणून भांडणं. पण तितक्याच आपुलकीनं बुलेटीनच्या वेळेस ऐकमेकांना मदत करणं. 😍😍 सुरुवातीला Amruta Abhyankarअमृताचं तुझं गॉडी गॉड