Posts

Showing posts from June, 2019

TRUST ME !

Image
              या कॉर्पोरेटच्या पॉलिटिकल दुनियेत स्वत:मधलं 'मी'... बालपण... खोडसळपणा  अन् कुठेतरी स्वत:लाच विसरायला लागतो. स्वत:मधल्या खुबी विसरतो. (मला तरी असं वाटतं). त्यात स्वभाव दिलखुलास असेल तर काय ते पॉलिटिक्स कळायलाही उशीर लागतो आणि जेव्हा कळतं तेव्हा मनाची गुंतागुंत वाढतंच जाते. हे असंच का ? तसंच का ? असं का करायचं ? जो है सो है ! उगाच का आव आणायचा ? असे बरेच्च प्रश्न. शेवटी ठरवतोच. आपण 'सो कॉल्ड कॉर्पोरेट पॉलिटीक्स'पासून लांब राहू. राहण्याचा प्रयत्नही करु लागतो. स्वत:ला प्रत्येक क्षणी प्रूफ करत असतो. पॉझिटीव्ह ठेवत असतो. YES I CAN DO IT वाली फिलिंग आणतो. पण कधी ना कधी याचा अतिरेक होतोच. चिडचिड...डिप्रेशन...हताश... होतोच. पण या सगळ्यापासून लांब रहायचं असेल, HAPPY-WAPPY लाईफ जगायची असेल तर कोणत्याही प्रसंगी स्वत:वर विश्वास ठेवणं खूप्प्प गरजेचं आहे. आपल्यात काही कमी नाही. मी सुद्धा हे करू शकते/ शकतो.  हा ATTITUDE ठेवणं  तसेच  'विश्वास' हा शब्द मनात बिंबवणं गरजेचं आहे .        अशाच काहीशा घटना  'चॉपस्टीक' सिनेमामध्ये अभिनेत्री मिथिला पालकरस