गावाकडच्या गोष्टी
'गावाकडच्या गोष्टी' गावाकडच्या गोष्टी म्हणटलं की आठवतं शेणाने सारावलेलं घर..मातीच्या भिंती.. चुलीवरचं जेवण.. रान... मोकळी हवा... वडाच्या पारावर बसून गावभरच्या केलेल्या गोष्टी... झेडपीची शाळा... मग कुठेतरी अलगद फुललेलं प्रेम... प्रेमापायी आणि दोस्तांच्यापायी खाल्लेला घरच्यांचा मार. किती छान वाटतं ना हे सगळं ऐकायला. पण सध्याच्या सोशल जगात आपण फक्त गावाकडच्या गोष्टी फेसबूक, ट्विटर , वॉटस अपवर शेअर करतो. # चलागावाकडं असा हॅशटॅग देतो. आयुष्यंच पोस्टवारीत निघून चाललंय. कधी तरी गावाकडे जायचं. गावच्या मंडळींसोबत शहराकडच्या पोस्ट दाखवून फुशारक्या मारायच्या. एवढं सगळं करुन सोज्वळ टिप पण द्यायची बरं का, शेतीत काय आहे ? दिवसभर राब-राब राबा , पिकाला पोटच्या पोरासारखं जपा , पाणी - खत , काय हवं नको ते सगळं बघायचं. पीक आलं की बाजारात जाऊन विकायचं तिथे ही हेलपाठे. तिथेही ‘ नाकापेक्षा हिरा जड ’ अशी अवस्था . शहर बरं. काम करा . महिन्याला रोख रक्कम हातात. थोडा त्रास होतो, पण पैसे मिळतात की, याच विचाराने आपण शहराची वाट धरतो. या नवख्या शहरात करिअर, आर्थिक प्रगती