Posts

Showing posts from September, 2017

#Beingस्वच्छंदी

Image
                 प्रत्येकाला स्वच्छंदी आयुष्य जगण्याची हौस असते म्हणा किंवा स्वप्न असतं , इच्छा असते. मग मुलगी असो वा मुलगा. पण ते प्रत्येकालाच जगता येईल असं नसतं. मुलांना काही प्रमाणात जगताही येतं किंवा जगतातही. मुलं स्वच्छंदी जगण्याची इच्छाही बोलून दाखवतात. पण   मुलींनी इच्छा बोलून दाखवणंही पाप. आणि मुलींनी जगायचं ठरवलं तरी अनेक बंधनं पायात बेड्या ठोकून असतातच. अशाच काही मुलींच्या स्वप्नांची प्रतिनिधित्वं करणारी  #MovingOut   ही वेबसिरीज....     ‘ मुव्हींग आऊट ’   या वेबसिरिजमध्ये स्वच्छंदी जगणाऱ्या नायिका रेवाची (अभिज्ञा भावे) ही कथा आहे. लग्न म्हणजे आयुष्य मानणारा समाज , लग्नासानाठी आई – वडिलांचा दबाव , घाई , काळजी तसेच स्वत : ला मॉड म्हणवून घेणारे उच्च शिक्षित , चांगल्या कॉर्पोरेट कंपन्यात जॉब करणाऱ्या तरुणांचे विचार पाहून नायिकेची अस्वस्थता त्यात स्वत : च्या विचारांसाठी हवी असलेली मोकळीक , स्वच्छंदी जगण्यासाठी असलेली उर्मी नायिकेला गप्प बसू देत नाही. त्यामुळे ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेते.                यानंतर तीला हवं तसं घर मिळतं का ? की मैत्रिणीच्