Posts

गावाकडच्या गोष्टी

Image
    'गावाकडच्या गोष्टी'      गावाकडच्या   गोष्टी म्हणटलं की आठवतं   शेणाने सारावलेलं घर..मातीच्या भिंती.. चुलीवरचं जेवण.. रान... मोकळी हवा... वडाच्या पारावर बसून गावभरच्या केलेल्या गोष्टी... झेडपीची शाळा... मग कुठेतरी अलगद फुललेलं प्रेम... प्रेमापायी आणि दोस्तांच्यापायी खाल्लेला घरच्यांचा मार. किती छान वाटतं ना हे सगळं ऐकायला.        पण सध्याच्या सोशल जगात आपण फक्त गावाकडच्या गोष्टी फेसबूक, ट्विटर , वॉटस अपवर शेअर करतो. # चलागावाकडं असा हॅशटॅग देतो. आयुष्यंच पोस्टवारीत निघून चाललंय. कधी तरी गावाकडे जायचं. गावच्या मंडळींसोबत शहराकडच्या पोस्ट दाखवून फुशारक्या मारायच्या. एवढं सगळं करुन सोज्वळ टिप पण द्यायची बरं का, शेतीत काय आहे ? दिवसभर राब-राब राबा , पिकाला पोटच्या पोरासारखं जपा , पाणी -   खत , काय हवं नको ते सगळं बघायचं. पीक आलं की बाजारात जाऊन विकायचं तिथे ही हेलपाठे. तिथेही ‘ नाकापेक्षा हिरा जड ’ अशी अवस्था . शहर बरं. काम करा . महिन्याला रोख रक्कम हातात. थोडा त्रास होतो, पण पैसे मिळतात की, याच विचाराने आपण शह...

#Beingस्वच्छंदी

Image
                 प्रत्येकाला स्वच्छंदी आयुष्य जगण्याची हौस असते म्हणा किंवा स्वप्न असतं , इच्छा असते. मग मुलगी असो वा मुलगा. पण ते प्रत्येकालाच जगता येईल असं नसतं. मुलांना काही प्रमाणात जगताही येतं किंवा जगतातही. मुलं स्वच्छंदी जगण्याची इच्छाही बोलून दाखवतात. पण   मुलींनी इच्छा बोलून दाखवणंही पाप. आणि मुलींनी जगायचं ठरवलं तरी अनेक बंधनं पायात बेड्या ठोकून असतातच. अशाच काही मुलींच्या स्वप्नांची प्रतिनिधित्वं करणारी  #MovingOut   ही वेबसिरीज....     ‘ मुव्हींग आऊट ’   या वेबसिरिजमध्ये स्वच्छंदी जगणाऱ्या नायिका रेवाची (अभिज्ञा भावे) ही कथा आहे. लग्न म्हणजे आयुष्य मानणारा समाज , लग्नासानाठी आई – वडिलांचा दबाव , घाई , काळजी तसेच स्वत : ला मॉड म्हणवून घेणारे उच्च शिक्षित , चांगल्या कॉर्पोरेट कंपन्यात जॉब करणाऱ्या तरुणांचे विचार पाहून नायिकेची अस्वस्थता त्यात स्वत : च्या विचारांसाठी हवी असलेली मोकळीक , स्वच्छंदी जगण्यासाठी असलेली उर्मी नायिकेला गप्प बसू देत नाही. त्यामुळे ती घर सोडून जाण्या...

BOOK REVIEW - 'बकुळा'

Image
             काही पुस्तकं नकळतपणे मनाला चटका लावून जातात , विचार करायला भाग पाडतात . प्रेम , त्याग , अस्तित्व , स्वातंत्र्याची जाणीव करुन जातात ... अशीच काहीशी  ‘ बकुळा ’  ही लघुकादंबरी .      जात , धर्म , स्वाभिमान आणि दोन कुटुंबातील वैमनस्यात वाढलेले ‘ ती आणि तो ’ . दोघंही हुशार , बुध्दीवान , स्वप्नाळू . तो आणि ती प्रेमात पडतात . दोन्ही कुटुंबांच्या घरामध्ये उभे असलेलं बकुळा हे झाड , जसं दोन्ही घराच्या भांडणांचं साक्षीदार हे झाड आहे तसंच तो आणि तिच्या प्रेमाचा साक्षीदारही .    घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघंही लग्न करतात . काटकसरीने आपला संसार उभा करतात . यशाच्या उंच शिखरावर त्याने पोहचावं म्हणून ती   स्वप्नांचा त्याग करते . आपण मिळवलेल्या यशात तो स्वार्थी , Business minded बनतो .    हे यश त्याला  ‘ तीला ’ ही विसरायला लावतं . त्यागाच्या परिभाषेला जाणीव आणि प्रेमाची झालर नसेल तर स्वभाव आत्मकेंद्री ब...

लग्नाच्या नात्याकडून.... मैत्रिकडे

Image
आज फ्रेन्डशीप डे...     काय लिहावं याचा विचार करत होते. कॉलेज ग्रूपवर लिहावं की मास्टर ग्रूप की रुम पार्टनर की बेस्ट फ्रेन्डबद्दल...(एका   बेस्ट फ्रेन्डबद्दल लिहावं तर दुसरी म्हणायची मी नाही का ?) लिहायलाही घेतलं. काही नवीन लिहितोय वाटत नव्हतं. रटाळ आणि चघळलेले विषयावर लिहायलाही मूड येत नव्हता.     अचानक शेजारी राहणारे काका आणि काकीं नजरे समोर आले. त्यांना दोन मुली. दोघींचीही लग्न झालीयेत. त्यामुळे काका-काकी दोघं घरी एकटेच. पण काका-काकींना कधी वेळ घालवण्यासाठी कोणाची गरजही पडत नाही. '' हम काफी है एक दुजे के लिये ''...  त्यात रिटायर्ड कपल.        रिटायर्ड होणाऱ्या माणसांपुढे अनेक प्रश्न भेडसावत असतात. रिटायर्ड झाल्यावर काय करायचं की दुसरी नोकरी शोधायची की गावी जायचं ?? पण या आमच्या काका-काकींना बहुधा असे प्रश्न पडलेच नसावेत. माझ्या मते हे दोघं एकमेकांचे आयुष्याचे सोबती असण्याआधी चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या मैत्रिबद्दल लिहिण्यासाठी हा सगळा अट्टाहास... काका -काकींच्या मैत्रिच्या प्रवासाला सुरु ...