Posts

Showing posts with the label rakhi

डँबिस रिलेशन

Image
        ''देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत रहावे'' या म्हणीनुसार जगणारा आणि 'बहिणीला लुटणे' हा माझा जन्मसिध्द अधिकार मानणारा, माझा एकूलता एक भाऊ - प्रशांत             प्रशांतवर लिहायचं कारण असं की ''रक्षाबंधन'' हा दिवस बहीण - भाऊ नात्यासाठी खास असतो. बहीण भावाला राखी बांधते. भावाला समाधानी आयुष्य, मर्यादित संपत्ती लाभो म्हणून बहीण प्रार्थना करते आणि भाऊ बहीणीला गिफ्ट देतो. पण आमच्याकडे असं नाही बरं का. दोघांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचे. म्हणजे कसं भाडणं नको.       इथे एक किस्सा शेअर करावासा वाटतो. रक्षाबंधनाच्या दिवशी आमची भाडणं झाली की .... तो - तुला नाही एेकायचं ना माझं, चल मग माझं गिफ्ट परत दे. मी - मग माझी राखी मला परत दे.      मग आमच्या मातोश्रींनी यावर रामबाण उपाय शोधून काढला. रक्षाबंधन असो वा भाऊबीज दोघांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचं म्हणजे भाडणं नको.      बहीण - भावाच्या नात्यात जर भांडणं नसतील ते कसलं नातं. राजकीय लोकांसारखं दबाव टाकणं. आरोप - प्रत्यारोप...