Posts

Showing posts with the label webseries

TRUST ME !

Image
              या कॉर्पोरेटच्या पॉलिटिकल दुनियेत स्वत:मधलं 'मी'... बालपण... खोडसळपणा  अन् कुठेतरी स्वत:लाच विसरायला लागतो. स्वत:मधल्या खुबी विसरतो. (मला तरी असं वाटतं). त्यात स्वभाव दिलखुलास असेल तर काय ते पॉलिटिक्स कळायलाही उशीर लागतो आणि जेव्हा कळतं तेव्हा मनाची गुंतागुंत वाढतंच जाते. हे असंच का ? तसंच का ? असं का करायचं ? जो है सो है ! उगाच का आव आणायचा ? असे बरेच्च प्रश्न. शेवटी ठरवतोच. आपण 'सो कॉल्ड कॉर्पोरेट पॉलिटीक्स'पासून लांब राहू. राहण्याचा प्रयत्नही करु लागतो. स्वत:ला प्रत्येक क्षणी प्रूफ करत असतो. पॉझिटीव्ह ठेवत असतो. YES I CAN DO IT वाली फिलिंग आणतो. पण कधी ना कधी याचा अतिरेक होतोच. चिडचिड...डिप्रेशन...हताश... होतोच. पण या सगळ्यापासून लांब रहायचं असेल, HAPPY-WAPPY लाईफ जगायची असेल तर कोणत्याही प्रसंगी स्वत:वर विश्वास ठेवणं खूप्प्प गरजेचं आहे. आपल्यात काही कमी नाही. मी सुद्धा हे करू शकते/ शकतो.  हा ATTITUDE ठेवणं  तसेच  'विश्वास' हा शब्द मनात बिंबवणं गरजेचं आहे .        अशाच काहीशा घटना ...

गावाकडच्या गोष्टी

Image
    'गावाकडच्या गोष्टी'      गावाकडच्या   गोष्टी म्हणटलं की आठवतं   शेणाने सारावलेलं घर..मातीच्या भिंती.. चुलीवरचं जेवण.. रान... मोकळी हवा... वडाच्या पारावर बसून गावभरच्या केलेल्या गोष्टी... झेडपीची शाळा... मग कुठेतरी अलगद फुललेलं प्रेम... प्रेमापायी आणि दोस्तांच्यापायी खाल्लेला घरच्यांचा मार. किती छान वाटतं ना हे सगळं ऐकायला.        पण सध्याच्या सोशल जगात आपण फक्त गावाकडच्या गोष्टी फेसबूक, ट्विटर , वॉटस अपवर शेअर करतो. # चलागावाकडं असा हॅशटॅग देतो. आयुष्यंच पोस्टवारीत निघून चाललंय. कधी तरी गावाकडे जायचं. गावच्या मंडळींसोबत शहराकडच्या पोस्ट दाखवून फुशारक्या मारायच्या. एवढं सगळं करुन सोज्वळ टिप पण द्यायची बरं का, शेतीत काय आहे ? दिवसभर राब-राब राबा , पिकाला पोटच्या पोरासारखं जपा , पाणी -   खत , काय हवं नको ते सगळं बघायचं. पीक आलं की बाजारात जाऊन विकायचं तिथे ही हेलपाठे. तिथेही ‘ नाकापेक्षा हिरा जड ’ अशी अवस्था . शहर बरं. काम करा . महिन्याला रोख रक्कम हातात. थोडा त्रास होतो, पण पैसे मिळतात की, याच विचाराने आपण शह...

#Beingस्वच्छंदी

Image
                 प्रत्येकाला स्वच्छंदी आयुष्य जगण्याची हौस असते म्हणा किंवा स्वप्न असतं , इच्छा असते. मग मुलगी असो वा मुलगा. पण ते प्रत्येकालाच जगता येईल असं नसतं. मुलांना काही प्रमाणात जगताही येतं किंवा जगतातही. मुलं स्वच्छंदी जगण्याची इच्छाही बोलून दाखवतात. पण   मुलींनी इच्छा बोलून दाखवणंही पाप. आणि मुलींनी जगायचं ठरवलं तरी अनेक बंधनं पायात बेड्या ठोकून असतातच. अशाच काही मुलींच्या स्वप्नांची प्रतिनिधित्वं करणारी  #MovingOut   ही वेबसिरीज....     ‘ मुव्हींग आऊट ’   या वेबसिरिजमध्ये स्वच्छंदी जगणाऱ्या नायिका रेवाची (अभिज्ञा भावे) ही कथा आहे. लग्न म्हणजे आयुष्य मानणारा समाज , लग्नासानाठी आई – वडिलांचा दबाव , घाई , काळजी तसेच स्वत : ला मॉड म्हणवून घेणारे उच्च शिक्षित , चांगल्या कॉर्पोरेट कंपन्यात जॉब करणाऱ्या तरुणांचे विचार पाहून नायिकेची अस्वस्थता त्यात स्वत : च्या विचारांसाठी हवी असलेली मोकळीक , स्वच्छंदी जगण्यासाठी असलेली उर्मी नायिकेला गप्प बसू देत नाही. त्यामुळे ती घर सोडून जाण्या...