Posts

Showing posts with the label story commonmen patla tr ghya pradnyakagale blog pradnyablog andheri couple

TRUST ME !

Image
              या कॉर्पोरेटच्या पॉलिटिकल दुनियेत स्वत:मधलं 'मी'... बालपण... खोडसळपणा  अन् कुठेतरी स्वत:लाच विसरायला लागतो. स्वत:मधल्या खुबी विसरतो. (मला तरी असं वाटतं). त्यात स्वभाव दिलखुलास असेल तर काय ते पॉलिटिक्स कळायलाही उशीर लागतो आणि जेव्हा कळतं तेव्हा मनाची गुंतागुंत वाढतंच जाते. हे असंच का ? तसंच का ? असं का करायचं ? जो है सो है ! उगाच का आव आणायचा ? असे बरेच्च प्रश्न. शेवटी ठरवतोच. आपण 'सो कॉल्ड कॉर्पोरेट पॉलिटीक्स'पासून लांब राहू. राहण्याचा प्रयत्नही करु लागतो. स्वत:ला प्रत्येक क्षणी प्रूफ करत असतो. पॉझिटीव्ह ठेवत असतो. YES I CAN DO IT वाली फिलिंग आणतो. पण कधी ना कधी याचा अतिरेक होतोच. चिडचिड...डिप्रेशन...हताश... होतोच. पण या सगळ्यापासून लांब रहायचं असेल, HAPPY-WAPPY लाईफ जगायची असेल तर कोणत्याही प्रसंगी स्वत:वर विश्वास ठेवणं खूप्प्प गरजेचं आहे. आपल्यात काही कमी नाही. मी सुद्धा हे करू शकते/ शकतो.  हा ATTITUDE ठेवणं  तसेच  'विश्वास' हा शब्द मनात बिंबवणं गरजेचं आहे .        अशाच काहीशा घटना ...

ते खोटं जरा खटकलंच...

                          ...तशी माझी 2 शिफ्ट सुरू होती. न्यूज चॅनलमध्ये कामाला असल्याने घरी निघण्याची वेळ रात्री 10 किंवा 10.30 ... ऑफिस तसं मेट्रो स्टेशनपासून अवघ्या 15    मिनिटांच्या अंतरावर असल्याने चालत जाण्याची सवय. असंच एकदा रात्री 10 च्या सुमारास अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीजवळून हेडफोनस लावून गाणी ऐकत होते. त्यामुळे गाण्यासोबत स्वत : ला इमॅजिन करत आणि हेडफोन्स लावल्यामुळे आणि स्वत : मध्येच गुंतुन गेले होते. तेवढ्यात एक जोडपं आपल्या चिमुरडीसह अचानक समोर आलं. काहीशा घाबरल्या आणि अस्वस्थ सारखे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. तसं मी कधीही कोणत्याही भिकारी किंवा रस्त्यात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीशी न बोलताच सावधगिरीने पुढे जाते. पण या वेळेस असं काहीच घडलं नाही. माझी पाऊलं काहीशी तिथेच थांबली... कदाचित त्यांच्यासोबत असलेल्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे...अन्   दीदी एक मदत करा या प्रश्नाने...      हेडफोन्स काढून मी त्यांना विचारलं काय झालं ?  काही हवंय का ?....  आमची ग...