Posts

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

Image
मी मुंबईची.... पण माझं आणि पुण्याचं नातं तसं काहीसं वेगळंच... कारण माझं मास्टर इथेच झालं. हॉस्टेलला राहिले. त्यामुळे चांगल्या - वाईट आठवणी, गंमतीजमती, कडू -  गोड अनुभव मला पुण्याने दिले...आले तेव्हा नको वाटायचं पुणे... सगळंच काही स्लोली... पण हळुहळु मित्र / मैत्रिणी मिळाल्या...रुममेटशीही चांगली गट्टी जमली...पण  नुकतीच सुरु झालेली ही  'बॅचलर जर्नी'  आणि मास्टरचे 2 वर्ष कधी संपले कळलंच नाही... त्यानंतर अधूनमधून पुण्याला जायचे....                एकदा पुण्याला गेले असताना आमच्या रुममेट फेन्डसचा आईस्क्रीम खायला जाण्याचा प्लान ठरला... प्रत्येक जणी आपआपली फेवरेट आईस्क्रीम सांगू लागल्या. माझी सांगायची वेळ आल्यावर मला आठवले की मला माझ्या मित्राने तवा आईस्क्रीमबद्दल सांगितले होते. मी हे माझ्या फ्रेण्डसलाही शेअर केले. जाऊया म्हणून सगळ्यांनी गोंधळ घातला. पण ही तवा आईस्क्रीम खराडीत मिळते फक्त एवढंच मला माहित होतं. मला वाटलं हे सांगितल्यावर सगळ्यांची निराशा होईल. 7 वाजून गेल्याने सगळे नाही बोलतील. कारण कर्वेनगर ते खराडी दीड तासाचा प्रवास...