Posts

ट्यूज डे विथ मॉरी (Tuesday With Morrie) BOOK REVIEW

Image
  मरायचं कसं हे ठरलं की माणूस जगायचं कसं हे शिकतो. 'ट्यूज डे विथ मॉरी' या पुस्तकातील ही ओळ अगदी मनापासून पटली आहे. आजन्म शिक्षक असलेले मॉरी आणि त्यांचा आजन्म विद्यार्थी मिच यांची ही कथा...  प्राध्यापक मॉरी आणि विद्यार्थी मिच       या पुस्तकात कॉलेजमध्ये प्राध्यापकाला लागलेला विद्यार्थ्याचा लळा, वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची चर्चा, कॉलेज संपल्यानंतर तुटलेला संपर्क, पुन्हा काही वर्षांनी विद्यार्थ्याला अचानक आपल्या प्राध्यापकाला झालेली भेटण्याची इच्छा, नेमकं त्याचवेळेस मरणाच्या दारात असलेले प्राध्यापक यानंतर त्या दोघांमधील आयुष्य, प्रेम, करिअर, कुटुंब, मृत्यू या विषयांवर रंगलेली प्रदीर्घ चर्चा बरंच काही आपल्याला शिकवून जातात.      मृत्यू डोळ्यासमोर तरळत असताना आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे आणि समोरच्याला काहीतरी देण्याची भावाना असणारे  मॉरी कुठे आणि आपण कुठे? छोटुसं आयुष्य आहे रे भरभरून प्रेम करा, असं आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो. पण आपला मृत्यू उंबऱ्यावर असताना आयुष्यावर प्रेम करणं कसं शक्य आहे यार???  अर्थात हा प्रश्न मलाही पडला.पण या प...

"२६/११ कसाब आणि मी" - BOOK REVIEW

Image
          26/11 .... मुंबईकरांसाठी काळा दिवस... या आठवणी मनाच्या कोपऱ्यात डोकवल्या तरी डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहत नाही. डोक्याच्या शिरा आपोआप ताणल्या जातात. शरीराचा एकूण एक अवयव पेटून उठतो. नुसता राग राग आणि राग येतो. पोटात गोळा येतो. मन अजूनही कुठेतरी घाबरतं. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. सूडाची भावना जागी होते. मग मनात सुरू होतो प्रतिशोध.....हो ना ??? पण शांत व्हा. आपण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत अतिरेकी कसाबला फासावर चढवण्यात आपलं पोलीस दल यशस्वी झालं आहे.     या दहशतवादी हल्ल्याचा तपासाचा अनुभव लेखक रमेश महाले यांनी "२६/११ कसाब आणि मी" या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने या घटनेतील अनेक बारकावे समोर येतात.    ही घटना घडत असताना सामान्य माणसापासून ते रेल्वे कर्मचारी, रहिवासी, पोलीस अधिकारी, शिपाई, हवालदार या सगळ्यांनी आपल्या देशाप्रती कर्तव्य चोखपणे पार पाडलं. जीवावर उदार होऊन अनेकांनी नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. आणि स्वत : चे प्राण दिले ही.   काही घटना कदाचित वृत्...
Image
                   हम्पी मैं आपका स्वागत हैं!                                    (भाग 2-3)         ट्रीपचा दुसरा दिवस लवकरच सुरू करायचा म्हणून लवकरच झोपलो. कधी ऑफिसला लवकर न उठणाऱ्या आम्ही तिघी सकाळी 5 वाजताच उठलो. आज सकाळी विठ्ठल मंदिरात जायचं होतं. हम्पीमधलं पर्यटकांचं सर्वाधिक आकर्षक असलेलं पर्यटन स्थळ...विठ्ठल मंदिर. सहाजिकच आमचंही. विठ्ठल मंदिर हे फोटोजेनीक ठिकाण असल्याने आणि सकाळच्या वेळेस पर्यटकही कमी असतील म्हणून सकाळच्या वेळेस जाण्याचं ठरवलं.      तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेल्या विठ्ठल मंदिरात ५६ खांब आहे. या खांबातून संगीत ऐकू येत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.        मंदिराचे बांधकाम राजा कृष्णदेवराय यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाल्याची माहिती मिळते. या मंदिरात एक रथ, तुळशी वृदांवन, म्युझिकल पिलर तर मंदिराच्या मंडपात विष्णुचे अवतार कोरलेले पहायला मिळतात. ह...
Image
            हम्पी मैं आपका स्वागत हैं !!!   ( भाग - 1-3)                  हम्पी... कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील अगदी छोटसं गाव. गाव छोटसं असलं तरी या गावात पाहण्यासारखं आणि घेण्यासारखं (जगण्याच्या दृष्टीने) बरंच काही आहे.     Hampi, Karanataka.                                                      हनुमानाचा जन्म याच गावात झाल्याने हनुमान, प्रभू श्रीराम यांच्याविषयी लोकांच्या मनात विशेष स्थान आहे. या गावात पोहचताच तुम्हाला बहुतेकजण भगव्या रंगाची कपडे परिधान केलेले दिसतील. आम्हालाही हे सगळं नवीन होतं. म्हणून  रिक्षावाल्या काकांना विचारलं. इथे लोक हनुमानाची विशेष पूजा करतात. साकडं घालतात. भगव्या रंगाचं शर्ट आणि लुंगी ३ महिने, वर्षभर घालू ; आमच्या पारड्यात तुझ्या कृपेची फुलं टाकण्याचा नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ही कपडे नदीत वि...

माझं दुसरं प्रेम

Image
      कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनाविरोधात निर्णय घ्यावे लागतात. एखाद्या गोष्टीत मन अडकत असताना, त्या गोष्टीशी जडलेल्या प्रेमाची चाहूल लागत असतानाच मन घट्ट करुन निर्णय घ्यावा  लागतो. अशा वेळेस मनाची झालेली घालमेल शब्दात मांडणं माझ्यासाठी तरी खूप अवघड आहे. वर्षाभरापूर्वी जय महाराष्ट्र चॅनल जॉईन केलं. अन् कधी कंपनीच्या आधी तिकडच्या माणसांशी होऊन गेले कळलंच नाही. आपण नेहमी म्हणतो परत एकदा शाळा, कॉलेजचे दिवस अनुभवायला मिळावे. मात्र ते मिळतातच असे नाही. पण इथे पुन्हा मला दोन्ही अनुभव जगायला मिळाले. फक्त फरक होता त्यावेळेसच्या मस्ती..मजाक..जोक्स आणि मित्र -मैत्रिणींमध्ये. तेव्हा जरा बालीश मस्ती..जोक्स आता थोडे वयात आलेले एवढंच 🤣🤣🤣 शाळेसारखं ऑफिसमध्ये आल्यावर एकमेकांना पहिला प्रश्न विचारणं, आज डब्ब्यात काय आणलंय ? बातम्या मोजण्यासाठी हातासह पायांचा उपयोग करणं, एकमेकांचा वेळोवेळी अपमान करणं, मुद्दाम खोडी काढणं, जुने वाद उखरुन काढणं, पेन ढापला म्हणून भांडणं. पण तितक्याच आपुलकीनं बुलेटीनच्या वेळेस ऐकमेकांना मदत करणं. 😍😍    सुरुवातीला Amruta A...

TRUST ME !

Image
              या कॉर्पोरेटच्या पॉलिटिकल दुनियेत स्वत:मधलं 'मी'... बालपण... खोडसळपणा  अन् कुठेतरी स्वत:लाच विसरायला लागतो. स्वत:मधल्या खुबी विसरतो. (मला तरी असं वाटतं). त्यात स्वभाव दिलखुलास असेल तर काय ते पॉलिटिक्स कळायलाही उशीर लागतो आणि जेव्हा कळतं तेव्हा मनाची गुंतागुंत वाढतंच जाते. हे असंच का ? तसंच का ? असं का करायचं ? जो है सो है ! उगाच का आव आणायचा ? असे बरेच्च प्रश्न. शेवटी ठरवतोच. आपण 'सो कॉल्ड कॉर्पोरेट पॉलिटीक्स'पासून लांब राहू. राहण्याचा प्रयत्नही करु लागतो. स्वत:ला प्रत्येक क्षणी प्रूफ करत असतो. पॉझिटीव्ह ठेवत असतो. YES I CAN DO IT वाली फिलिंग आणतो. पण कधी ना कधी याचा अतिरेक होतोच. चिडचिड...डिप्रेशन...हताश... होतोच. पण या सगळ्यापासून लांब रहायचं असेल, HAPPY-WAPPY लाईफ जगायची असेल तर कोणत्याही प्रसंगी स्वत:वर विश्वास ठेवणं खूप्प्प गरजेचं आहे. आपल्यात काही कमी नाही. मी सुद्धा हे करू शकते/ शकतो.  हा ATTITUDE ठेवणं  तसेच  'विश्वास' हा शब्द मनात बिंबवणं गरजेचं आहे .        अशाच काहीशा घटना ...

ते खोटं जरा खटकलंच...

                          ...तशी माझी 2 शिफ्ट सुरू होती. न्यूज चॅनलमध्ये कामाला असल्याने घरी निघण्याची वेळ रात्री 10 किंवा 10.30 ... ऑफिस तसं मेट्रो स्टेशनपासून अवघ्या 15    मिनिटांच्या अंतरावर असल्याने चालत जाण्याची सवय. असंच एकदा रात्री 10 च्या सुमारास अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीजवळून हेडफोनस लावून गाणी ऐकत होते. त्यामुळे गाण्यासोबत स्वत : ला इमॅजिन करत आणि हेडफोन्स लावल्यामुळे आणि स्वत : मध्येच गुंतुन गेले होते. तेवढ्यात एक जोडपं आपल्या चिमुरडीसह अचानक समोर आलं. काहीशा घाबरल्या आणि अस्वस्थ सारखे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. तसं मी कधीही कोणत्याही भिकारी किंवा रस्त्यात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीशी न बोलताच सावधगिरीने पुढे जाते. पण या वेळेस असं काहीच घडलं नाही. माझी पाऊलं काहीशी तिथेच थांबली... कदाचित त्यांच्यासोबत असलेल्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे...अन्   दीदी एक मदत करा या प्रश्नाने...      हेडफोन्स काढून मी त्यांना विचारलं काय झालं ?  काही हवंय का ?....  आमची ग...